पपईच्या वड्या

साहित्य - पिकलेल्या पपईचा गर 2 वाट्या, ओल्या नारळाचा कीस 1 वाटी, साखर सव्वा वाटी, तूप.

कृती - सर्वप्रथम पपईचा गर काढून त्यातील बिया काढून नारळाचा कीस व साखर सर्व एकत्र करून जाड बुडाच्या कढईत गॅसवर आटवावे. वड्या करण्याइतपत घट्ट झाले की ताटाला तूप लावून त्यात हा गर सारखा पसरवून वड्या पाडाव्यात.

थंड झाल्यावर वड्या काढून डब्यात ठेवाव्यात. ह्या वड्या रंगाला व चवीला चवदार लागतात शिवाय पौष्टिक, पाचक व टिकाऊ असतात.

वेबदुनिया वर वाचा