उपवासाचा बटाट्याचा किस

शनिवार, 30 जुलै 2022 (10:02 IST)
साहित्य- 2 बटाटे, 1 टेस्पून तूप किंवा शेंगदाण्याचे तेल, 1/2 टिस्पून जिरे, 2 हिरव्या मिरच्या, 2 मोठे चमचे शेंगदाण्याचा कूट, चवीपुरते मिठ, कोथिंबीर
 
कृती:
बटाटे स्वच्छ धुवून सोलून घ्यावे.
किसणीवर किसून घ्यावे. 
किसलेला बटाटा गार पाण्यात घालावा.
कढईत तूप गरम करावे. 
जिरे घालावे. 
मिरचीचे तुकडे घालावे.
दोन्ही हातांनी पिळून किसलेला बटाटा पाण्यातून काढून घ्यावा आणि त्यात घालावा.
निट परतून मध्यम आचेवर वाफ काढावी. 
अधून-मधून हालवत वाफ घेत सुमारे 5 मिनिटांनी शेंगदाण्याचा कूट घालावं. 
बटाटा कढईला चिकटणार याची काळजी घ्यावी.
बटाटा शिजेपर्यंत वाफ काढावी. 
मिठ घालावे. आवड असल्यास जरा साखर घालावी. 
कोथिंबीर घालून गरमागरम सर्व्ह करावा.
यासोबत लिंबाचं लोणचे स्वाद वाढवतं.
 
विशेष: शिजवताना पाणी घालू नये नाहीतर बटाट्याचा किस चिकट होतो.
आपल्या आवडीनुसार भाजलेले अख्खे शेंगदाणे देखील घालू शकता.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती