जागतिक फोटोग्राफी दिवस केवळ आपल्या देशातच नव्हे,तर जगभरात साजरा केला जातो.फोटोग्राफीचा छंद जोपासणाऱ्या अशा लोकांना समर्पित 19 ऑगस्ट रोजी जागतिक फोटोग्राफी दिन साजरा केला जातो.एक फोटोग्राफर,आपल्या कॅमेरात आपल्या आठवणी साठवून ठेवतो.पूर्वीच्या काळी कॅमेरे नसायचे.ग्रामीण भागातील लोकांना गावापासून दूरवर फोटो काढण्यासाठी जावे लागायचे. आता तर सगळ्यांकडे कॅमेरा आणि मोबाईल आहे.फोटोग्राफी चा छंद जोपासणारे फोटो काढण्यासाठी जगाच्या पाठीवर कुठे ही जातात.