इंदिरा गांधी पुण्यतिथी 2023 :पंडित जवाहरलाल नेहरू यांची कन्या श्रीमती इंदिरा गांधी यांचा जन्म 19 नोव्हेंबर 1917 रोजी एका प्रतिष्ठित कुटुंबात झाला होता. त्यांनी इकोले नौवेल्ले, बेक्स (स्विझरलैंड), इकोले इंटरनेशनेल, जिनेवा, पुणे व मुंबई स्थित प्युपल्स ओन स्कूल, बैडमिंटन स्कूल, ब्रिस्टल, विश्व भारती, शांति निकेतन आणि समरविले कॉलेज, ऑक्सफोर्ड सारख्या प्रमुख संस्थांमधून शिक्षण प्राप्त केले .
श्रीमती इंदिरा गांधीं, कमला नेहरू स्मृती रुग्णालय; गांधी स्मारक निधी व कस्तुरबा गांधी स्मृती न्यास सारख्या संस्थांशी जोडलेल्या होत्या. त्या स्वराज भवन न्यासाच्या अध्यक्ष होत्या. 1955 मध्ये त्या बाल सहयोग, बाल भवन मंडळ व बालकांच्या राष्ट्रीय संग्रहालयाशी संबंधित राहिल्या. श्रीमती इंदिरा गांधीं यांनी अलाहाबादमध्ये कमला नेहरू विद्यालयाची स्थापना केली होती. त्या 1966-77 मध्ये जवाहरलाल नेहरू विद्यापीठ व ईशान्य विद्यापीठासारख्या काही मोठ्या संस्थानांशी संलग्न राहिल्या. त्यांनी दिल्ली विद्यापीठ न्यायालय, 1960-64 मध्ये युनेस्कोच्या भारतीय प्रतिनिधीमंडळ व कार्यकारी मंडळ तसेच 1962 ला राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या सदस्य म्हणून काम केले. त्या संगीत नाटक अकादमी, राष्ट्रीय एकता परिषद, हिमालयन पर्वतारोहण संस्था, दक्षिण भारत हिंदी प्रचार सभा, नेहरू स्मारक संग्रहालय, पुस्तकालय समाज व जवाहरलाल नेहरू स्मृती निधी यांच्याशी जोडलेल्या राहिल्या.
त्यांनी आपल्या जीवनात अनेक क्षेत्रात लौकिक प्राप्त केला. त्यांना 1972मध्ये भारतरत्न पुरस्कार, 1972 मध्ये बांगलादेश मुक्तीकरिता मेक्सिकन अकादमी पुरस्कार, 1973 मध्ये एफएओ चे दुसरे वार्षिक पदक व 1976 मध्ये नागरी प्रचारिणी सभेकडून साहित्य वाचस्पती (हिंदी) पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. 1953 साली श्रीमती इंदिरा गांधीं यांना अमेरिकेच्या मदर पुरस्काराने, मुसद्देगिरीतील उत्कृष्ट कार्याबद्दल इटलीने इसाबेला डीइस्टे पुरस्कार व येल विद्यापीठाने हाउलंड मेमोरियल पुरस्कार देऊन गौरविले. फ्रांस जनमत संस्थेच्या सर्वेक्षणानुसार त्या 1967 व 1968 मध्ये फ्रान्सच्या जनतेमधल्या सर्वात लोकप्रिय महिला होत्या. 1971 मध्ये अमेरिकेच्या विशेष गैलप जनमत सर्वेक्षणानुसार त्या जगातील सर्वात लोकप्रिय महिला होत्या. प्राण्यांच्या संरक्षणासाठी 1971 मध्ये अर्जेंटिना सोसायटीकडून त्यांना मानद उपाधी देण्यात आली होती.
त्यांच्या प्रमुख प्रकाशनांमध्ये द इयर्स ऑफ चॉलेंज-(1966-69), द इयर्स ऑफ इंडेवर (1969-72), इंडिया (लंडन) 1975, इंडे'(लॉसेन) 1979 आणि लेख तसेच भाषणांचे विविध संग्रह समाविष्ट आहेत. त्यांनी व्यापक रूपाने देश-परदेशात प्रवास केला. श्रीमती इंदिरा गांधीं यांनी अफगाणिस्तान, बांगलादेश, भूतान, ब्रम्हदेश, चीन, नेपाळ आणि श्रीलंका सारख्या शेजारील देशांचाही दौरा केला. त्यांनी फ्रांस, जर्मन लोकशाही प्रजासत्ताक, जर्मनी संघ प्रजासत्ताक, गुयाना, हंगेरी, इराण, इराक व इटली अशा देशांचाही दौरा केला. श्रीमती इंदिरा गांधीं यांनी अल्जेरिया, आर्जेन्टिना, ऑस्ट्रेलिया, ऑस्ट्रिया, बेल्जियम, ब्राझील, बल्गेरिया, कॅनडा, चिली,चेकोस्लोवाकिया,बोलिविया आणि इजिप्त सारख्या अनेक देशांचा दौरा केला. त्या इंडोनेशिया, ,जपान, जमैका, केनिया, मलेशिया, मॉरिशस, मेक्सिको, नेदरलंड, न्यूजीलंड, नायजेरिया, ओमान, पोलंड, रोमानिया, सिंगापुर, स्वित्झर्लंड, सिरीया, स्वीडन, टांझानिया, थाईलंड, त्रिनिदाद तसेच टोबैगो, संयुक्त अरब अमिरात, ब्रिटन, अमेरीका, रशिया संघ, उरुग्वे, वेनेजुएला, यूगोस्लाविया, झांबिया आणि जिम्बाब्वे सारख्या कित्येक यूरोपीय-अमेरीकी आणि आशियाई देशांच्या दौऱ्यावर त्या गेल्या. त्यांनी संयुक्त राष्ट्र मुख्यालयामध्ये देखील आपल्या उपस्थितीने छाप पाडली.