शनिवारी सकाळी कर्नाळा पक्षी अभयारण्यात मधमाश्यांच्या थव्याने पर्यटकांवर हल्ला केल्याने एका44 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला तर सात जण जखमी झाले. मृताचे नाव संदीप पुरोहित असे आहे. तो कोपरखैरणे येथील आहे. ते शनिवारी सकाळी त्याची पत्नी, मुलगा आणि कुटुंबातील मित्रांसह कर्नाळा किल्ल्याची सहल करण्यासाठी अभयारण्यात आले होते .मधमाशांच्या हल्ल्यात संदीप यांची पत्नी चारुपुरोहित आणि लक्ष पुरोहित जखमी झाले असून त्यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर संदीप यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले.
या पर्यटकांमध्ये एक पर्यटक बेशुद्ध झाला त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
जुन्या मुंबई- पुणे महामार्गावर असलेले कर्नाळा अभ्यारण्य हे पर्यटकांचे आवडते ठिकाण असून शनिवारी आणि रविवारी मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी असते. शनिवारी देखील माटुंगातील एका महाविद्यालयातील काही मुले ट्रेकिंगसाठी आली असता त्यांच्यावर देखील मधमाश्यांच्या थ्वयाने हल्ला केला. या मध्ये तिघे जखमी झाले.