तसेच जगप्रसिद्ध ताडोबा व्याघ्र प्रकल्पात वाघांचे दर्शन घेण्यासाठी जगभरातील वन्यजीवप्रेमी तसेच देशी पर्यटकही उत्सुक आहे. पण, ताडोबात वाघ पाहण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला किमान दोन महिने वाट पाहावी लागेल, कारण फेब्रुवारीपर्यंत जंगल सफारीचे बुकिंग फुल्ल झाले आहे. ताडोबातील जंगल सफारी वाघांच्या दर्शनाची हमी देते, म्हणूनच वन्यजीवप्रेमी आणि पर्यटक ताडोबाकडे आकर्षित होतात. नागपूरला हवाई नेटवर्क, नागपूर ते ताडोबापर्यंतचे उत्कृष्ट रस्त्यांचे जाळे आणि ताडोबा परिसरात राहण्याची उत्तम सोय उपलब्ध करून देणारे रिसॉर्ट यामुळे पर्यटक नेहमीच ताडोबाला पसंती देतात.