Surya grahan 2022: या वर्षातील पहिले सूर्यग्रहण होणार एप्रिलच्या शनिश्चरी अमावस्येला

Webdunia
शनिवार, 30 एप्रिल 2022 (10:38 IST)
पुढील महिन्यात एप्रिलमध्ये या वर्षाचे पहिले सूर्यग्रहण 2022 मध्ये होणार आहे. हे ग्रहण शनिश्चरी अमावस्येच्या दिवशी होत आहे. हे ग्रहण ३० एप्रिल ते १ मे दरम्यान होणार आहे. पण या ग्रहणाचा सुतक काळ ग्राह्य राहणार नाही. जेथे ग्रहण दिसत नाही, तेथे त्याचा प्रभाव पडत नाही, अशी श्रद्धा आहे. हे ग्रहण भारतातील कोणत्याही भागात दिसणार नाही. त्यामुळे या ग्रहणाला धार्मिक महत्त्व राहणार नाही. हे ग्रहण दक्षिण अमेरिका, दक्षिण प्रशांत महासागर इत्यादी ठिकाणी दिसणार आहे. 
 
शनिवारी येणाऱ्या अमावस्याला शनिश्चरी अमावस्या म्हणतात. या दिवशी पितरांचे स्नान, दान आणि नैवेद्य केले जाते. सूर्यग्रहणापूर्वीही पितरांचे श्राद्ध आणि स्नान दान करणे शुभ राहील. ज्योतिषाचार्यांच्या मते 30 एप्रिलच्या रात्री 12 पासून ग्रहण सुरू होणार असल्याने त्यापूर्वी पितरांचे श्राद्ध आणि तर्पण करणे शुभ राहील. 
 
हिंदू कॅलेंडरनुसार, 30 एप्रिल 2022 रोजी वृषभ राशीमध्ये सूर्यग्रहण होईल. वर्षातील पहिले सूर्यग्रहण आंशिक असेल. वर्षातील दुसरे सूर्यग्रहण 25 ऑक्टोबर 2022 रोजी होणार आहे. 

संबंधित माहिती

पुढील लेख