विजयादशमी 2021 : राशीनुसार श्रीरामाचे नाव जपा

गुरूवार, 14 ऑक्टोबर 2021 (23:23 IST)
दसऱ्याच्या दिवशी आपल्या-आपल्या राशीनुसार देवांची पूजा केल्यानं जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश मिळतं. चला जाणून घेऊ या 12 राशीनुसार या दसऱ्याला पूजा कशी करावी...
 
* मेष राशीच्या लोकांनी श्रीरामाची उपासना करावी, ॐ रामभद्राय नम: मंत्राचा जप करावा.
* वृषभ राशींच्या लोकांनी हनुमानाची पूजा करावी, ॐ आञ्जनेयाय नम: मंत्राचा जप करावा.
* मिथुन राशींच्या लोकांनी रामाच्या दरबारात बेसनाचे लाडू अर्पण करावे. ॐरामचंद्राय नम: मंत्राचे जप करावे.
* कर्क राशीच्या लोकांनी श्री सीता-रामाला गोड पान अर्पण करावे. ॐ जानकी वल्लभाय नम: मंत्राचा जप करावा.
* सिंह राशीच्या लोकांनी श्रीरामाची पूजा करावी. ॐ जनार्दनाय नम: मंत्राचा जप करावा.
* कन्या राशीच्या लोकांनी हनुमानाची पूजा करावी. 'ॐ शर्वाय नम:'मंत्राचा जप करावा.
*तूळ राशीच्या लोकांनी राम दरबारावर मध अर्पण करावे. ॐ सौमित्र वत्सलनम: मंत्राचा जप करावा.
* वृश्चिक राशीच्या लोकांनी हनुमानावर जुईचे अत्तर अर्पण करावं. भरत वंदीत: नम: मंत्राचा जप करावा.
* धनू राशीच्या लोकांनी तुळशीचं पान हातात घेऊन ॐ दान्ताय नम: मंत्राचा जप करावा.
*मकर राशीच्या लोकांनी श्री सीता राम मौली अर्पण करावं. श्री रघुनंदन भरताग्रज नम: मंत्राचे जप करावा.
* कुंभ राशीच्या लोकांनी हनुमान मंत्र ॐ वायुपुत्राय नम: चा जप करावा.
* मीन राशीच्या लोकांनी श्रीरामाच्या दरबारात मेंदी अर्पण करावी. दशरथ नंदनाय नम: मंत्राचा जप करावा.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती