साहित्य : दोन कप बारीक कापलेल्या भाज्या (मटर, गाजर, कोबी), एक बारीक कापलेला कांदा, दोन चमचे लोणी, दोन चमचा मैदा, चार कप दूध, मीठ, 1/2 चमचा पांढऱ्या मिरचीची पूड, बारीक चिरलेली कोथिंबीर.
कृती : वर दिलेल्या सर्व भाज्या व लोणी एका भांड्यात टाकावे. त्यात एक कप पाणी घालून 5-10 मिनिट शिजवून घ्याव्या. मैदा व दूध एकजीव करून ते मिश्रण शिजलेल्या भाज्यांत टाकावे. नंतर मीठ व पांढऱ्या मिरच्यांची पूड घालून घट्ट होईपर्यंत शिजवावे. कोथिंबीर घालून सर्व्ह करावे.