धोकादायक आजार गुलियन-बॅरे सिंड्रोमचे लक्षणे काय आहे आणि खबरदारी काय घ्याल जाणून घ्या
सोमवार, 27 जानेवारी 2025 (18:50 IST)
राज्यातील अनेक शहरांमध्ये या धोकादायक आजाराने शिरकाव केला असून सोलपुरात या आजाराचा बळी झाला आहे. राज्यात जीबीएसच्या वाढत्या प्रकारणांमुळे लोक घाबरले आहे. या आजाराचे प्रकरण वाढल्यामुळे आरोग्य विभागवर अतिरिक्त दबाव वाढले आहे. गुइलेन-बॅरे सिंड्रोम आता पुण्यात पसरत असून या आजाराची एकूण 100 प्रकरणे नोंदवली आहे.
गुइलेन-बॅरे सिंड्रोम हा एक स्वयं प्रतिकार न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे. हा थेट मानवी रोगप्रतिकारक शक्तीवर हल्ला करते. यामुळे लोकांना चालायला, उठायला, बसायला त्रास होतो.
त्याचा प्रभाव वाढल्याने श्वास घेण्यास त्रास सहन करावा लागतो. यामुळे पक्षाघाताचा धोकाही वाढतो.
हा आजार विषाणू जीवाणू संसर्गामुळे होतो. या आजारामुळे रुग्णांची रोग प्रतिकारक शक्ति कमकुवत होते.
दुहेरी दृष्टी आणि डोळे हलविण्यात आणि पाहण्यात अडचण
बोलणे, चघळणे किंवा गिळण्यात अडचण
तीव्र स्नायू वेदना
लघवी करताना आणि शौचास त्रास होतो
श्वास घेण्यास त्रास होणे
उपचार -
गुइलेन-बॅरे सिंड्रोमसाठी सध्या कोणताही ज्ञात उपचार नाही. परंतु वैद्यकीय सहाय्य आणि उपचारांमुळे पुनर्प्राप्ती वेगवान होऊ शकते आणि लक्षणे कमी होऊ शकतात. प्लाझ्मा थेरपी आणि इम्युनोग्लोबिन थेरपीच्या मदतीने त्यावर उपचार केले गेले आहेत.
खबरदारी -
या आजारापासून बचाव करण्याचा कोणताही मार्ग ज्ञात नाही, तथापि, चांगली स्वच्छता पाळल्यास अशा समस्यांचा धोका कमी केला जाऊ शकतो. आपल्या हातांच्या स्वच्छतेची काळजी घ्या, कोणत्याही पृष्ठभागाला स्पर्श करणे टाळा किंवा स्पर्श केल्यानंतर हात धुवा. तसेच अशी लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांची मदत घ्या.