कृती : आदल्या दिवशी रात्री बाजरी पाण्यात भिजत घालावी. सकाळी पाण्यातून काढावी व कपड्यावर पसरून सुकवावी. सालपटे टाकून द्यावी. दूध गरम करावे. त्यात बाजरी घालावी व ढवळत राहावे. बाजरी शिजली की त्यात साखर घालावी. ढवळत राहावे. दाट झाले की उतरवावे. पसरट भांड्यात काढावे. वरून वेलदोड्याची पूड व बदामाचे काप घालावे. फ्रीजमध्ये ठेवून खीर थंडगार करावी.