साहित्य : 2 कप दही, 1/2 कप साखर, 1/2 रोज सरबत, बर्फ आवश्यकतेनुसार, 1/2 कप साय, सजावटीसाठी पिस्त्याचे काप.
कृती : दही, साखर, सरबत आणि बर्फाला फेस येईपर्यंत ब्लँडरमध्ये चालवावे. नंतर या मिश्रणाला काचेच्या ग्लासमध्ये भरावे, प्रत्येक ग्लासमध्ये वरून साय टाकावी. पिस्त्याच्या कापांनी सजवून सर्व्ह करावी.