पालक सूप

ND
साहित्य : 1 कांदा, 2 चमचे लोणी, 2 कप पालकाची पानं चिरून, अर्धं लिंबू, 2 चमचे क्रीम, 1 लहान बटाटा, 2 1/2 चमचे वरण शिजलेलं, 3 कप पाणी, मीठ चवीप्रमाणे, 1 चमचा साखर, 1/2 चमचा जिरंपूड.

कृती : कांदा खूप बारीक चिरावा. लोण्यावर परतावा. बटाटा उकडून सोलून किसावा. हा कीसही कांद्यावर परतावा. त्यावरच पालक परतावा. त्यावर लेगच लिंबाचा रस घालावा. मीठ, साखरही घालून एक-दोन मिनिटं झाकण ठेवावं. मग हे मिश्रण, वरण आणि पाडी हे सर्व मिक्सरमधून घुसळून घ्यावं. पुन्हा गरम करावं, उकळल्याबरोबर उतरवू त्यात क्रीम घोटून घालावं. चिमूटभर जिरं पूड भुरभुरावी.

वेबदुनिया वर वाचा