साहित्य : 3 लाल गाजरं, एक मोठा बटाटा किसून, 1 कांदा बारीक चिरून, सायीसकट 1/2 कप दूध, एक टेबलस्पून बटर, 3 मिरे, 4 लवंगा, दीड चमचा मीठ, अर्धा चमचा साखर, अर्धा चमचा व्हिनेगार किंवा लिंबूरस, एक ब्रेड स्लाईस, चार कप पाणी.
कृती : गाजर-बटाटा शिजवून मिक्सरमधून काढून घ्यावे. पॅनमध्ये लोणी पातळ करून त्यावर कांदा परतावा. त्यातच मिरे, लवंगा परताव्या व पाणी घालून उकळावं. त्यात गाजर-बटाटा प्युरी व दूध घालून मंद आजेवर उकळी आणावी. मीठ, साखर, लिंबूरस घालून तळलेले ब्रेडचे तुकडे घालून गरम गरम सर्व्ह करावे.