महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर शंकराच्या पूजेत आणि प्रसादात थंडाईला विशेष महत्त्व आहे. ही थंडाई केवळ चविष्टच नाही, तर शरीराला थंडावा देणारी आणि पौष्टिकही असते. तसेच महाशिवरात्रीला थंडी संपून उन्हाळ्याची चाहूल लागत असते, अशा वेळी बडिशेप आणि खसखस असलेली ही थंडाई शरीरातील उष्णता कमी करण्यास मदत करते.
कृती-
सर्वात आधी वरील सर्व मसाल्याचे साहित्य कोमट पाण्यात किमान ४ ते ५ तास भिजत ठेवा. भिजवलेले सर्व साहित्य पाणी निथळून मिक्सरमध्ये घ्या. त्यात थोडे दूध घालून एकदम गुळगुळीत पेस्ट तयार करा. एका मोठ्या पातेल्यात १ लिटर दूध गरम करायला ठेवा. त्यात साखर आणि केशराच्या काड्या घाला. दुधाला एक उकळी आली की गॅस मध्यम करा. तयार केलेली थंडाईची पेस्ट दुधात घाला आणि ५-७ मिनिटे मंद आचेवर सतत हलवत राहा, जेणेकरून मसाल्याचा स्वाद दुधात उतरेल. दूध थोडे घट्ट झाले की गॅस बंद करा. थंडाई पूर्णपणे गार होऊ द्या. त्यानंतर तिला किमान २-३ तास फ्रिजमध्ये ठेवा. थंडगार थंडाई ग्लासमध्ये ओता. वरून गुलाबाच्या पाकळ्या आणि पिस्त्याचे काप घालून सजवा.