Cucumber Lemonade उन्हाळ्यात थंड थंड कुकुम्बर लॅमनेड प्या, रिफ्रेश व्हाल

Cucumber Lemonade उन्हाळ्या पिण्यासाठी काही गार हवं हवंस वाटतं. अशात काकडी आणि लिंबू यात पाण्याचे भरपूर प्रमाण आढळतं जे शरीरासाठी आवश्यक असतं. या वस्तूंना आहारात सामील केल्याने शरीरातील सर्व टॉक्सिंस बाहेर काढण्यात मदत होते तर चला जाणून घेऊया घरी कुकुम्बर लॅमनेड तयार करण्याची सोपी रेसिपी -
 
साहित्य-2 काकड्या, 20 पुदीन्याची पाने, 1/2 टीस्पून लेमन जेस्ट,  1/2 कप लिंबाचा रस, 4 टेबलस्पून साखर, 5 कप पाणी, 
गार्निशिंगसाठी- 4-5 पुदीन्याची पाने, आइस क्यूब्स, लिंबाची पातळ स्लाईस
 
कृती - सर्वात आधी काकडी धुऊन तुकड्यांमध्ये कापून घ्या.
आता मिक्सरमध्ये काकडी आणि पुदीन्याची पाने घालून वाटून घ्या.
नंतर लिंबाचा रस, लेमन जेस्ट आणि साखर घालून पुन्हा मिक्सीमध्ये मिश्रण चालवून घ्या.
कुकुम्बर लॅमनेड तयार आहे याला एका ग्लासमध्ये घालून वरुन पुदीन्याची पाने टाकून गार्निश करा. आईस क्यूब टाका आणि ग्लासच्या साईडला लिंबाची पातळ स्लाईस लावा.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती