स्फोटांच्या ठिकाणी चोरट्यांचा सुळसुळाट

एकीकडे रक्ताने माखलेले कपडे आणि विव्हळत पडलेले मृतदेह असा हाहाकार राजधानीतील प्रमुख बाजार पेठांमध्ये माजला असतानाच दुसरीकडे मानवतेला काळिमा फसणाऱ्या काही जणांनी अनेक दुकाने आणि मृतदेहांवर आपला हात साफ केला.


स्फोटांनंतर अनेक ठिकाणी चोरीच्या घटना घडल्याची तक्रार व्यापाऱ्यांनी केली आहे. या भागात स्फोट झाल्यानंतर एक वयस्कर आजोबांनी मदतकार्य करणाऱ्यांना पाणी देण्याचे काम सुरू केले. त्यांनी काही जणांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर पाणी वाटपाचे काम सुरू केले असतानाच त्यांचा पाण्याचा ड्रम आणि त्यावरील काही ग्लासही लोकांनी लंपास केल्याची माहिती या आजोबांनी दिली.

वेबदुनिया वर वाचा