राजधानी दिल्लीत झालेल्या स्फोटांबद्दलचा इशारा दहा दिवसांपुर्वीच आपण पंतप्रधान मनमोहन सिंग यांना दिला होता. परंतु केंद्र सरकारने ही बाब गांभीर्याने न घेतल्याचा आरोप गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी केला आहे.
अहमदाबाद स्फोटांचा तपास करताना गुजरात पोलिसांच्या हाती काही महत्त्वाचे धागेदोरे आले असून अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांनीही आपले लक्ष राजधानी दिल्ली असल्याचे कबूल केले होते.
यानंतर आपण पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भेट घेत त्यांना याविषयीची माहिती दिल्याचे मोदी यांनी स्पष्ट केले.
अहमदाबादनंतर आता दिल्लीत स्फोट करण्याचा डाव असल्याचे दहशतवाद्यांनी यापूर्वीच स्पष्ट केले होते. याची माहिती आपण सिंग यांना दिल्यानंतरही त्यांनी याकडे काणाडोळा केल्याचा आरोप त्यांनी केला.