या दिवाळीत तुमच्यातील लक्ष्मीचे पूजन करा

लक्ष्मी ही धन- संपत्ती आणि समृद्धीची देवता आहे. उपजीविकेसाठी आणि जीवनात प्रगती करण्यासाठी एक अत्यावश्यक घटक म्हणून आपल्याला धन संपत्ती मिळालेली आहे. केवळ पैसा असण्यापेक्षाही जास्त ते बरेच काही आहे. मुबलक प्रमाणात ज्ञान,कौशल्ये आणि कला असणे असा त्याचा अर्थ आहे. लक्ष्मी ही अशी शक्ती आहे जी आपल्या आध्यात्मिक आणि भौतिक अशा सर्व दृष्टीकोनातून संपूर्णपणे अभिव्यक्त होते.

लक्ष्मीचा संबंध लक्ष्याशी म्हणजे ध्येयाशी आहे. ती अशी शक्ती आहे जी तुम्हाला तुमच्या मूळ स्रोताकडे, म्हणजेच तुमच्या लक्ष्याकडे घेऊन जाते. ही शक्ती आठ रुपांमधून आपल्यावर कृपेचा वर्षाव करत असते.

WD


आदि लक्ष्मी म्हणजे मूळ स्रोताची स्मृती. जेव्हा आपण हे विसरून जातो की आपण या संपूर्ण सृष्टीचाच भाग आहोत तेव्हा आपल्याला आपण स्वत: अगदी तुच्छ आणि असुरक्षित आहोत असे वाटू लागते. आदि लक्ष्मी हे असे रूप आहे जी आपल्याला आपल्या मूळ स्रोताशी जोडते आणि त्यामुळे सामर्थ्य वाढते आणि मन:शांती मिळते.

WD


धनलक्ष्मी हे भौतिक संपत्तीचे रूप आहे. आणि विद्या लक्ष्मी हे ज्ञान, कौशल्य आणि कला यांचे रूप आहे. धान्यलक्ष्मी ही अन्नधान्याच्या रूपातील संपत्तीच्या रुपाने आपल्या समोर येते. असे म्हणतात की ‘जसे अन्न तसे मन’, म्हणजेच जे अन्न आपण खातो त्याचा आपल्या मनाशी थेट संबंध असतो. योग्य त्यां प्रमाणात आणि योग्य ते अन्न योग्य वेळी आणि योग्य त्यां जागी सेवन केले तर तर त्याचा आपल्या शरीरावर आणि मनावर चांगला परिणाम होतो.

WD
संतत लक्ष्मी संतती आणि सृजनशीलतेच्या रूपात दिसते.भरपूर सृजनशीलता, काळा आणि कौशल्य असलेल्या लोकांवर ह्या लक्ष्मीचा वरदहस्त असतो. धैर्यलक्ष्मी ही धैर्याच्या रूपातील संपत्ती बनून येते. विजयालक्ष्मी ही जयाच्या रूपात येते. भाग्यलक्ष्मी ही सौभाग्याच्या आणि समृद्धीच्या रूपात येते. जीवनातील वेगवेगळ्या पायऱ्यांवर ती वेगवेगळ्या रूपात येते.

पुराणात असे म्हटले आहे की सूर आणि असुर यांच्यात जेव्हा समुद्र मंथन झाले तेव्हा अमृताच्या बरोबर लक्ष्मी वर आली. ( विरोधी मूल्यांमुळे मनातील होणारे द्वंद्व याचेच हे द्योतक आहे.) जेव्हा तुमच्याकडे लक्ष्मी असते, योग्य प्रकारची धन संपत्ती असते तेव्हा तुमचे जीवन अमृतमय होऊन जाते.

पाणी हे प्रेमाचे प्रतिक आहे. लक्ष्मीचे पाण्यातून वर येणे हेच दर्शवते की योग्य प्रकारची संपत्ती ही प्रेमातूनच निर्माण होते. भक्ती ही सर्वात उच्च प्रतीची संपत्ती आहे आणि आणि ते जीवनातील अमृतासमान आहे.

WD
लक्ष्मी ही पाण्यावरच्या कमळात बसलेली दाखवली जाते. कमल हे वैराग्याचे प्रतिक आहे. कमळाच्या पानावरील पाण्याचा थेंब पानाला अजिबात न चिकटटा पानावर फिरत असतो. त्याचं प्रमाणे आपण संपत्तीत जास्त अडकून न रहाता आणि त्याला धरून न ठेवता राहिलो तर मग त्यातून जे निर्माण होईल ते चीरस्वरूपी आणि फुलासारखे हलके असेल. अशी संपत्ती जीवनाला आधार देणारी असते आणि त्याने समृद्धी आणि संपन्नता येते. संपत्ती पाण्याप्रमाणे प्रवाही असावी. पाणी साठून राहिले तर त्याची शुद्धता कमी होते. त्याचप्रमाणे संपत्तीचा उपयोग आणि त्याची किंमत ती प्रवाही ठेवली तरच वाढते.

लक्ष्मी दागिन्यांनी मढलेली असते आणि तिच्या दोन हातात कमळाचे फूल असते. ह्यातून जीवनाच्या उत्सवाचे आणि तेजाचे अंग दिसून येते. समृद्धी असूनही त्या संपत्तीबद्दलची आसक्ती नाही. पुढे जाऊन असे म्हणता येईल की जर ही संपत्ती मानवतेच्या कार्यासाठी वापरली तर तुम्ही त्यां दलदलीत अडकून पडणार नाही कारण ती फुलाप्रमाणे हलकी असेल. बिटर दोन हाताच्या मुद्रा आहेत त्या असे दर्शवतात की आशीर्वाद आहे आणि धीर धरा.


WD
दिवाळी हा दिव्यांचा उत्सव आहे. धन संपत्तीच्या सर्व रुपांचा सन्मान करण्याची आणि आपले जीवन आध्यात्मिक ज्ञानाने आणि महालक्ष्मीच्या शक्तीने उजळून टाकण्याची ही वेळ आहे. महा म्हणजे महानता. महालक्ष्मी म्हणजे महान संप्प्त्ती अशी संपत्ती की ज्याची आठ रूपे आहेत. आध्यात्मिक संपत्ती आपल्या सर्व सुखांची काळजी घेते. आदि भौतिक, आदिदैविक आणि आध्यात्मिक. या मंगल प्रसंगी सर्वांना सुआरोग्य, आनंद, आणि समृद्धी लाभो ही शुभेच्छा !

लेखिका श्री श्री रविशंकर यांच्या भगिनी, ध्यान प्रशिक्षक आणि आर्ट ऑफ लिव्हिंगच्या महिला आणि बाल कल्याण कार्यक्रमाच्या संचालिका आहेत. त्याचप्रमाणे त्या आंतरराष्ट्रीय महिला संमेलनाच्या अध्यक्षा आहेत. हे संमेलन बंगलोर येथे ७ ते ९ फेब्रुवारी २०१४ या काळात संपन्न होणार आहे.

वेबदुनिया वर वाचा