दिवाळीसाठी रांगोळी का बनवतात, यामागील रोचक इतिहास जाणून घ्या
सोमवार, 9 नोव्हेंबर 2020 (14:03 IST)
चौसष्ट कलांपैकी एक चित्रकलेचा एक अंग आहे अल्पना. यालाच मांडणा देखील म्हणतात आणि याचेच रूप आहे रांगोळी. प्राचीन भारतात पूर्वी दिवाळीत मांडणा बनवायची प्रथा होती. पण आता रांगोळीचा प्रादुर्भाव जास्त आहे, तरी ही आज देखील काही ग्रामीण भागात मांडणा बनविण्याची पद्धत आहे.
रांगोळी किंवा मांडणा का बनवतात - भारतात रांगोळी किंवा मांडणा विशेषतः होळी, दिवाळी, नवदुर्गा उत्सव, महाशिवरात्री आणि सांजा उत्सवासाठी बनवतात. मांडणा किंवा रांगोळीला श्री आणि समृद्धीचे प्रतीक मानतात. असे मानले जाते की ज्या घरात यांचे सुंदर चिन्ह अंकित केलेले असतात तेथे लक्ष्मी नांदते. सर्व देवी आणि देव मांडणा किंवा रांगोळी बघून आनंदी होतात. मांडणा किंवा रांगोळी घराच्या सौंदर्यात वाढ करते.
देवघरात आणि मुख्य दारावर शुभ चिन्हांनी रांगोळी बनवल्याने दैवी शक्ती आकर्षित होतात. या मुळे घरात आनंदाचे वातावरण तयार होतं. मान्यतेनुसार रांगोळीच्या आकृत्या घराला वाईट आत्मा आणि दोषांपासून दूर ठेवतात.
रांगोळीचा इतिहास - अल्पना किंवा मांडणा ही फार प्राचीन लोककला आहे. आर्य सभ्यतेमध्ये मोहंजोदरो आणि हडप्पामध्ये देखील अल्पनांचे चिन्ह दिसून येतात.
अनेक उपास किंवा पूजा आहेत ज्यामध्ये अल्पना बनवल्या आहेत, आर्यांच्या युगाच्या पूर्वीची आहे. अल्पना वात्स्यायनच्या कामसूत्रात वर्णिल्या चौसष्ट कलांपैकी एक आहे. भारताच्या प्रत्येक प्रांतात वेगवेगळ्या पद्धतीने मांडणा किंवा रांगोळी बनवतात आणि प्रत्येक प्रांतात याचे वेगवेगळे नाव आहेत.
याला उत्तर प्रदेशात चौक पुरवणे, राजस्थान, छत्तीसगड आणि माळवामध्ये मांडणा, बिहारमध्ये आरिपन, बंगालमध्ये अल्पना, महाराष्ट्रात रांगोळी, कर्नाटकात रंगवल्ली, तामिळनाडू मध्ये कोल्लम, उत्तरांचल मध्ये एपण, आंध्रप्रदेशात मुग्गीपन किंवा मुग्गुलू, हिमाचल प्रदेशात अदूपना, कुमाऊमध्ये लिखथाप किंवा थापा आणि केरळ मध्ये कोलम म्हणतात.
भारतातील दक्षिणेकडील राज्य तामिळनाडूच्या बाबतीत असे मानले गेले आहे की या क्षेत्राची पूजनीय देवी 'आई थिरुमल' चे लग्न 'मर्गाजी' महिन्यात झाले होते. म्हणून या संपूर्ण महिन्यात या क्षेत्रातील प्रत्येक घरातील मुली सकाळी स्नानादीने निवृत्त होऊन रांगोळी बनवतात ज्याला कोलम म्हणतात.
असे म्हणतात की सर्वप्रथम रांगोळी ब्रह्मा यांनी बनवली होती. त्यांनी एका आंब्याच्या झाडाचे रस काढून पृथ्वीवर एक सुंदर बाईची आकृती बनवली नंतर त्या आकृतीचे रूपांतरण उर्वशी मध्ये झाले.
अशाच एका आख्यायिकेनुसार एकदा राजा चित्रलक्षणाच्या राज्यसभातील एका पुजारीच्या मुलाचे एकाएकी निधन झाले. पुजाऱ्याच्या या दुःखाला कमी करण्यासाठी राजाने भगवान ब्रह्माकडे विनवणी केली. ब्रह्मा प्रकटले आणि त्यांनी राजाला भिंतीवर त्या मुलाचे चित्र काढण्यास सांगितले, जो मरण पावला होता. ब्रह्माच्या आदेशावरून राजा चित्रलक्षणाने भिंतीवर त्या मुलाचे चित्र काढले आणि बघता-बघता त्याच चित्रा पासूनच त्या पुजार्याच्या मुलाचे पुनर्जन्म झाला.
अशाच प्रकारे रामायणात सीतेच्या लग्नाच्या मांडवात रांगोळी बनवली होती असा उल्लेख आढळतो. महाभारतात इंद्रप्रस्थ आणि द्वारिकेच्या निर्माणच्या वेळी देखील चित्रकलेचा उल्लेख मिळतो. रावणाचा वध केल्यानंतर प्रभू श्रीराम आपल्या पत्नीसह 14 वर्षाचे वनवास पूर्ण करून अयोध्येला परत येताना त्यांच्या आगमनाच्या आनंदात अयोध्येच्या लोकांनी आपल्या घराच्या अंगणात आणि मुख्य दारावर रांगोळ्या काढून सजावट केली होती.