दिवाळीची साफसफाई : परंपरा, इतिहास आणि जुन्या वस्तूंमध्ये अडकलेला माणूस
शुक्रवार, 21 ऑक्टोबर 2022 (19:09 IST)
अशोक पांडे
आपल्या देशाच्या बहुतांश भागात घराची वार्षिक साफसफाई दसरा आणि दावाळीच्या वेळी केली जाते.
पावसाच्या चार महिन्यांनंतर धूळ आणि ओलाव्यामुळे घर घाण झालेलं असतं. जी साफ करणं आणि घरात पुरेसा सूर्यप्रकाश येऊ देणं गरजेचं असत. जे शरद ऋतूच्या आगमनावेळी शक्य असतं.
घराच्या या वार्षिक साफसफाईच्या वेळी वर्षभरात घरात जमा झालेल्या नकोशा वस्तूसुद्धा फेकून दिल्या जातात. नको त्या वस्तू जमा करून ठेवण्याचा मोह आपल्याकड्या लोकांमध्ये जरा जास्तच असल्याचं यावेळी दिसून येतं.
जशी घरातली साफसफाई सुरू होते तसं कपाटं, सज्जे, पेट्यांमध्ये अनेक नको असलेल्या वस्तू जमल्याचं दिसून येतं. ज्याची संख्या अनेकदा हनुमानाच्या शेपटी प्रमाणे वाढतच जाणारी असते.
मानव आणि स्वच्छता
आता साधं उदाहरण घ्या ना, माझ्या घरात साफसफाई करताना देवघराच्या एका ड्रॉव्हरमध्ये एक छोटी गंजलेली डब्बी सापडली. लोखंडाच्या या डब्बीत काय होतं तर 25 वर्षं जूनं शेंदूर. जे माझ्या आत्यानं हरिद्वारवरून आणलं होतं.
याच देवघराच्या ड्रॉव्हरमध्ये एक पुठ्ठ्याचा डब्बा सापडला. जो माझ्या दिवंगत रज्जूमामांनी काश्मीरवरून आणला होता. ज्यावर बारीक नक्षीकाम करण्यात आलंय. ज्यात चार पायांचा कुठलातरी प्राणी चितारल्याचं तर कळतंय, पण तो कुत्रा आहे, मांजर आहे, उंट आहे की डायनासोर हे मात्र काही लक्षात येत नाहीये.
पण या डब्ब्यात कधीच काहीच ठेवण्यात आलं नव्हतं. देवघराच्या या खोलीत वेगवेगळ्या ठिकाणांवरून आणलेले गंगाजलचे गडू आणि बाटल्या ठेवण्यासाठी मांडणीचे दोन खण राखीव ठेवण्यात आलेत.
एका डब्ब्यात गेल्या शतकात तयार करण्यात आलेलं लाल मिर्चीचं आता काळकुट्ट झालेलं लोणचं सापडलं. पुठ्ठ्याच्या आणखी एका खोक्यात गेल्या 15 दिवाळ्यांच्यावेळी लक्ष्मी आणि गणपतीसाठी आणलेल्या वस्त्रांचा गठ्ठा सापडला. जी वस्त्र यंदासुद्धा नव्याने खरेदी केली जाणार आहेत.
काही डब्ब्यांमधून तर असा काही वास येतोय जो बहुदा मानवाच्या इतिसाहात पहिल्यांदाच कुणी घेत असावं. जगातल्या कुठल्याही भाषेत या वासाचं वर्णन करता येणार नाही.
वास घेऊन ओळखणं कठीणचं
जगातला असा कुठलाच मसाला नाही जो स्वयंपाक घराच्या कपाटात सापडत नाही. वर्षांनुवर्ष हे मसाले एकाच कपाटाच्या एकाच शेल्फवर एवढे टिकून राहिलेले असतात की ते एकमेकांना चांगलेच ओळखायला लागले आहेत.
एकमेकांच्या प्रेमात हे मसाले एवढे एकरुप झालेले असतात की ते सर्व एकसारखेच होऊन गेलेले असतात. ज्यांचा रंग पाहून किंवा वास घेऊन हे सांगणं कठीण असतं की मामीनं दिलेला मसाला कुठला आहे आणि मीठ कुठलं आहे.
एका डब्ब्यातल्या मसाल्याने तर विद्रोह केलेला. त्याने बुरशीबरोबर एवढी दोस्ती केलीय जसं की त्याला या जिवनातून मुक्ती घेऊन परमात्मामध्ये विलिन व्हायचं आहे.
40 वर्षं जुना चार डब्ब्यांचा एक सेट सापडला. लाल झाकणाचे हे डब्बे एकात एक सामावतील अशा आकाराचे आहेत. माझ्या एका चुलत भावानं त्याला नोकरी लागली तेव्हा पहिल्या पगारातून त्यानं हे गिफ्ट दिलं होतं.
आता तर तो प्रत्येक सणाला असे गिफ्ट पाठवत असतो. ज्याचं प्लास्टिक, डिझाई, झाकणं आणि रंग वापरून या चुलत भावाच्या जिवनाचा अख्खा इतिहास लिहिला जाऊ शकतो.
डालड्याचे प्लस्टिक आणि पत्र्याचे 20 डब्बे सापडले. अगदी एक किलोपासून पाच किलोपर्यंतचे. रथ वनस्पतीच्या डब्ब्यांची संख्यासुद्धा तेवढीच असावी. फरक फक्त एवढाच की त्यांचा रंग निळा आहे. ज्यांच्यावर छापलेल्या तारखा, पेरेस्त्रोइका, ग्लासनोस्त आणि लाल निशाण मिखाईल गोर्बाचेव्ह यांच्या युगाची आठवण करून देतात.
3 वर्षांपूर्वी खरेदी केलेल्या फ्रिजच्या खोक्यात तेलाच्या पत्र्यांचा डब्ब्यांचा खच सापडला आहे. जो पोटमाळ्याच्या एका कोपऱ्यात ठेवण्यात आला होता.
ऍल्युमिनिअम, लोखंड, पितळ, प्लास्टीक, पुठ्ठा, प्लायवूड, ताबं, लाकूड, स्टील, कागद अशा एक ना अनेक वस्तूंपासून तयार झालेल्या वेगगेवगळ्या 1 लाख डब्ब्यांना अजून साफ केलं जाणं बाकी आहे. ज्यामध्ये असलेल्या वस्तूंची ओळख पटायची आहे. ज्याचं वैज्ञानिक वर्गिकरण होणं बाकी आहे. माझ्या सारख्या नालायक मुलाची त्यावर नरज पडण्याआधी त्या सर्व गोष्टी पुन्हा एकदा दडवून ठेवायच्यासुद्धा बाकी आहेत.
जगातल्या इतर देशांबद्दल माहिती नाही, पण आपल्याकडे जुन्या वस्तूंचा मोह किती जुना आणि मजबूत आहे हे तपासायचं असेल दिवाळीची साफसफाई सुरू असलेल्या कुठल्याही घरी जा.
साफसफाईची कारणं आणि जगतिक संस्कृती
वर्षातून एकदा संपूर्ण घराची सफाई करण्याची जुनी परंपरा जगभरात सर्वत्र आहे. त्याची पाळंमुळं धर्म आणि सांस्कृतीशी निगडीत असल्याचं दिसून येतं.
काही संस्कृतींमध्ये तर खास त्यासाठीचे सणसुद्धा साजरे केले जातात. थंड हवामान असलेल्या युरोप आणि अमेरिकेत ही साफसफाई वसंत ऋतुच्या आगमनावेळी केली जाते.
तिथं वीजेचा शोध लागण्याआधी घरांमध्ये रात्रीच्या वेळी उजेडासाठी तेलाचे दिवे लावले जायचे. त्यासाठी रॉकेल आणि व्हेल माशाच्या तेलाचा वापर केला जायचा. तर घर उबदार ठेवण्यासाठी लाकडं किंवा कोळसा जाळला जायचा.
हिवाळ्याच्या दिवसांमध्ये अनेक आठवडे सूर्याचं दर्शन होत नसे. त्यातच कोळसा आणि लाकडं जाळल्यामुळे प्रत्येक खोलीमध्ये काजळी जमा झालेली असायची. घरातल्या वस्तूदेखील काळवंडलेल्या असायच्या.
पण वसंत ऋतूचं आगमन होताच घरातल्या महिला सर्व दारं-खिडक्या उघडून सूर्याच्या किरणांचं स्वागत करत. ज्याच्या स्फूर्तीदायक गरमीमध्ये पुढचे काही दिवस मग अंथरूणं धुवून सुकवली जायची.
अंगमेहनतीचं काम
मग वस्तूंवर चढलेली काजळी साफ केली जायची. झाडू आणि पुसणं वापरून प्रत्येक कोपरा साफ केला जायचा. हे अत्यंत जिकरीचं काम असायचं. महिलांचा या कामात मोठा वाटा असायचा.
डेलावेयर विद्यापिठात इतिहासाच्या प्रोफेसर असलेल्या सूजन स्ट्रासर यांनी 'नेव्हर डन: अ हिस्ट्री ऑफ अमेरिकन हाउसवर्क' नावाचं पुस्तक लिहिलं आहे. त्यात त्यांनी म्हटलंय, वसंत ऋतूमध्ये होणाऱ्या या साफसफाईमध्ये संपूर्ण घर रिकामं केलं जायचं.
बरेदचा तर घराची साफसफाई करताना पुरुषांना घरातून बाहेर हाकललं जायचं. करण त्यांना त्यातलं काहीच येत नसायचं किंवा त्यांना त्यात काही रुचीसुद्धा नसायची. कामात मदत करण्यापेक्षा पुरूष त्यात व्यत्यय आणण्यासाठीच ओळखले जायचे.
महिलांसाठी हे काम किती जिकरीचं होतं याचा उल्लेख 1864 मध्ये एका महिलेनं तिच्या डायरीत केला आहे. 20 वर्षांपूर्वी एका प्रदर्शनात ही डायरी लोकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली होती.
त्यांनी लिहिलंय, "मी स्वयंपाकघर आणि माजघराची सफाई एकूण 350 वेळा केली आहे. 362 दिव्यांमध्ये तेल भरलं आहे. इतर खोल्यांच्या आणि जिन्याच्या फरश्या 40 वेळा झाडून-पुसून काढल्या आहेत."
ख्रिश्चन आणि ज्यू संस्कृतीमध्ये पुरातन काळापासून एक वेगळीत परंपरा चालत आली आहे. सफाई झाल्यानंतर घरात रोटीच्या चुऱ्याचा एक कणही सापडता कामा नये अशी ही परंपरा आहे.
ज्यू धर्मग्रंथानुसार त्याचं कारण म्हणजे ज्यावेळी ज्यूंना घाईगडबडीत इजिप्त सोडून पळून जावं लागलं तेव्हा त्यांना रोटीचं पिठ आंबवून तयार होईपर्यंतसुद्धा वाट पाहता आली नव्हती. अशा न आंबवलेल्या पिठाच्या रोट्या तयार करताना खूप सारा चुरा सांडला आणि सर्वत्र पसरला.
त्यामुळे मग वसंत ऋतूमध्ये साफसफाई करताना घराच्या प्रत्येक कोपऱ्याची सफाई करण्याची परंपरा सुरू झाली. ज्याचा संबंध पुढे पासओवर नावाच्या ज्यू सणाशी जोडला गेला. पुढे मग पासओवरचा सण आणि प्रत्येक कोपऱ्याची सफाई हे समिकरण दृढ झालं.
अशीच काहीशी पंरपरा पारशी लोकांच्या नवरोज या सणावेळीसुद्धा पाळली जाते. जपान, थायलंड आणि दक्षिण आशियातल्या अनेक देशांमध्ये वसंत ऋतूच्यावेळी अशा प्रकारची घराची साफसफाई करण्याची परंपरा आहे.