दसर्याला सोने म्हणून आपट्याची पाने एकमेकांना देतात, याचे कारण आहे तरी काय-
1. असे म्हणतात की प्रभू श्रीराम यांनी लंकेवर आक्रमण करण्यापूर्वी शमी वृक्षाची पूजा केली होती.
2. जेव्हा श्रीराम अयोध्या परत आले होते तेव्हा त्यांनी लोकांना सोने वाटले होते. म्हणून प्रतीक स्वरुप लोक ही पाने देतात.
3. पांडवांनी अज्ञातवास दरम्यान आपली शस्त्रे या वृक्षावरच लपवले होते. नंतर शमी पूजन करुन वृक्षावरची आपली शस्त्रे परत घेतली.
4. महर्षी वरतन्तु यांनी आपल्या शिष्याकडून दक्षिणा म्हणून 14 कोटी स्वर्ण मुद्रा मागितल्या. तेव्हा राजा रघु यांना इंद्र यांनी शमी वृक्षाच्या माध्यमातून मुद्रा दिल्या होत्या.
5. दसर्याच्या दिवशी या वृक्षाचे पूजन केल्याने शनी प्रकोप शांत होतो कारण हे वृक्ष शनिदेवाचे साक्षात रूप मानले गेले आहे.
6. विजयादशमीच्या दिवशी शमी वृक्ष पूजा केल्याने घरात तंत्र-मंत्राचा प्रभाव नाहीसा होता.