Dhanteras 2022 धनत्रयोदशीला 10 पैकी कोणतीही 1 वस्तू खरेदी करा

शुक्रवार, 14 ऑक्टोबर 2022 (14:59 IST)
दिवाळीचा पाच दिवसांच्या सणात धनत्रयोदशीला खूप महत्तव आहे. या दिवशी भगवान धन्वंतरी, कुबेर आणि यमदेव यांची पूजा केली जाते. यावेळी अश्विन महिन्यातील अमावास्येला सूर्यग्रहण असल्याने दिवाळीचा सण 25 ऐवजी 24 ऑक्टोबरला साजरा केला जाणार आहे. अशात धनत्रयोदशीची तारीखही बदलली आहे. चला जाणून घेऊया धनत्रयोदशीचा सण कधी आहे आणि या दिवशी काय खरेदी करावी.
 
धनत्रयोदशी 2022 कधी आहे: द्वादशी तिथी शनिवार 22 रोजी संध्याकाळी 6.02 पर्यंत राहील, त्यानंतर त्रयोदशी सुरू होईल. त्रयोदशी दुसऱ्या दिवशी म्हणजेच 23 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 06:03 पर्यंत राहील. उदयतिथीनुसार, रविवारी 23 ऑक्टोबर 2022 रोजी धनत्रयोदशीचा सण साजरा केला जाईल.
 
धनत्रयोदशीच्या दिवशी भगवान धन्वंतरि, कुबेर आणि यमदेवाची पूजा केली जाते. तर चला जाणून घेऊया की धनत्रयोदशी या सणाला काय खरेदी करावी-
 
धनत्रयोदशीला या 10 पैकी कोणतीही एक वस्तू खरेदी करा:
1. सोनं: या दिवशी सोन्याचे दागिने खरेदी करण्याचीही परंपरा आहे. सोने हे लक्ष्मी आणि बृहस्पती यांचे प्रतीक आहे, त्यामुळे सोने खरेदी करणे शुभ ठरेल.
 
2. चांदी: या दिवशी काही लोक चांदीची नाणी खरेदी करतात. या नाण्यांवर लक्ष्मी आणि कुबेर यांची आकृती बनलेली असते.
 
3. भांडी: या दिवशी जुनी भांडी बदलून तांबे, पितळ आणि चांदीची नवीन भांडी खरेदी करणे शुभ ठरतं. पितळेची भांडी लक्ष्मी आणि बृहस्पतीचे प्रतीक आहेत, त्यामुळे या दिवशी सोने खरेदी करणे शक्य नसेल तर पितळेची भांडी नक्कीच खरेदी करा.
 
4. धणे: या दिवशी ग्रामीण भागात खडे धणे खरेदी केले जातात, तर शहरी भागात पूजेसाठी धणे खरेदी करतात. या दिवशी धणे बारीक करून त्यात गुळ मिसळून नैवेद्य दाखवला जातो.
 
5. नवीन कपडे: या दिवशी दिवाळीच्या दिवशी घालण्यासाठी नवीन कपडे खरेदी करण्याचीही परंपरा आहे.
 
6. लक्ष्मी-गणेशाची मूर्ती: या दिवशी लक्ष्मी पूजनात ठेवण्यासाठी लक्ष्मी आणि गणेशाची मूर्ती किंवा चित्रे खरेदी करतात आणि त्याच दिवशी धन्वंतरीच्या पूजेसाठी त्यांच्या मूर्ती किंवा चित्रे खरेदी करतात.
 
7. खेळणी : या दिवशी मुलांसाठी खेळणीही खरेदी केली जातात. मुलांचे मन प्रसन्न ठेवल्याने घरात सकारात्मक वातावरण निर्माण होते.
 
8. बताशे : या दिवशी पूजेच्या साहित्यासोबत बताशे इत्यादींचीही खरेदी केली जाते. त्यामुळे घरात सुख-समृद्धी येते.
 
9. गोमती चक्र आणि कवड्या : या दिवशी गोमती चक्रे मुलांच्या संरक्षणासाठी तर संपत्ती आणि समृद्धीसाठी कवड्या खरेदी करतात.
 
10. झाडू : या दिवशी झाडू खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. यामुळे वर्षभर घरातील नकारात्मक ऊर्जा घरापासून दूर राहते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती