तो होय गुरुनाथ । तियेप्रति सांगे हित । कोण कोणाचा हो सुत । वद ज्ञात असे तर ॥१॥
पृथ्व्यप्तेजोवाताकाश । हेच आले आकारास । मायामय संबंधास । तूंचि खास रडशी कीं ॥२॥
कोणी नहें निवारिती । गुणमय ते मरती । देवादिकां हीच गती । मेला मागुती न ये शोके ॥५॥
दे हा शव जाळावया । ती म्हणे जो दे अभया । बाध ये कीं त्याच्या वाक्या । कोण तया पुढें भजे ।
बोल कोणाचा ऐकेना । लोक गेले स्वसदना । पतिअह ती अंगना । आक्रोशना करीतसे ॥८॥
स्वप्नी नको रडूं म्हणून । स्वामी देती आश्वासन । पाहे जगी होवून । पुत्र संजीवन झाला ॥९॥