हो हा संन्यासी म्हणून । भिक्षा मागे शिव आपण । हिरण्यकशिपु दारण । करितां नखें तापलीं ॥१॥
जो विज्ञैकगम्य हरि । तो श्रीदत्त औदुंबरीं । शांत होतां तयावरी । वास करी श्रीसहित ॥२॥
तत्रत्य नर गंगानुज । भावें आला त्या गुरुराज । दाखवूनी तेथील गुज । देती निजप्रीती वर ॥५॥
तो नमूनी त्रिस्थली पुसे । क्षणें गुरु दावितसे । गुरु जाऊं म्हणतसे । दुःख होतसे योगिनीसी ॥६॥