तो सायन्देव म्हणे । म्लेच्छराजा माझें जिणें । हरील वाटे आजी त्याणें । बोलावणें केलें आहे ।
मीं अतःपर न डरें। गुरु म्हणती तूं जा त्वरें । परतवील तो सत्कारें । म्हणूनी करें आश्वासिती ।
हाची प्रसाद म्हणून । सायंदेव जातां यवन । मृतप्राय हो भिवून । गौरवूत त्या बोळवी ॥३॥
वंशवृद्धी निजभक्ती । गुरु देवून पुनः भेटी । सायंदेवा देवूं म्हणती । गुप्त होती पुढें स्वयें ॥४॥