ऐसें परिसुनी विप्र । म्हणे तेथें कोणा वर । लाधला बोला सविस्तर । ऐकें उत्तर सिद्ध म्हणे ॥१॥
एक दशग्रंथी विप्र । शिरोळग्रामीं मृतपुत्र । तद्भार्येसी एक विप्र । सांगे उग्रकर्मविपाक ॥२॥
अभयंकर रक्षु ऐसें । म्हणूनी सेवितसे । स्वप्नीं भूत मारीतसे । राखीतसे गुरु तिसी ॥५॥
सांगे तत् परिहार जसा । जागेंपणें करी तसा । तेणें मुक्त झाला पिसा । गुरु प्रसाद दे तिला ॥६॥
श्रेष्ठ तनयाचें व्रत । आरंभिता धनुर्वात । होवोनि तो वांकत । सन्निपात न शमें यत्नें ॥८॥
तो तद्भावें फिरवी नेत्र । मरे होतां अर्धरात्र माता रडे पिटी गात्र । बोधमात्र नायके ती ॥९॥