दत्तात्रेय जयंती : आदिगुरूंबद्दल 10 गोष्टी

सोमवार, 28 डिसेंबर 2020 (11:26 IST)
दरवर्षी मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला भगवान दत्तात्रेय यांची जयंती साजरी केली जाते. भारताच्या प्रत्येक प्रांतात त्यांची पूजा केली जाते. चला तर मग जाणून घेऊ या त्यांच्या बद्दल 10 गोष्टी.
 
1 आई-वडील - ब्रह्माजींचे मानसपुत्र महर्षी अत्री ह्यांचे वडील आणि ऋषी कर्दमाची कन्या आणि सांख्यिकीचे प्रवर्तक कपिलदेव यांची बहीण अनुसूया ही ह्यांची आई होती. श्रीमद्भागवतामध्ये महर्षी अत्री आणि अनुसूया यांच्याकडे त्रिदेवांच्या अंशातून तीन मुलांचे जन्म घेण्याचा उल्लेख आढळतो. असे म्हणतात की ब्रहमांच्या अंशातून चंद्र, विष्णूंच्या अंशातून दत्तात्रेय आणि भगवान शिवच्या अंशातून ऋषी दुर्वासा यांच्या जन्म झाला.
 
2 त्रिदेवमय स्वरूप - पुराणानुसार ह्यांचे तीन मुख, सहा हात असलेले त्रिदेवमयी स्वरूप आहे. चित्रामध्ये ह्यांच्या मागे एक गाय आणि पुढे चार कुत्रे दिसतात. औदुंबराच्या झाडाजवळ यांचे वास्तव्य सांगितले आहे. विविध मठात, आश्रम आणि देऊळात त्यांचे चित्र दिसतात.
 
3 आदिगुरू - गुरुदेव दत्तात्रेयांच्या रूपात ईश्वर आणि गुरु यांचे रूप आहेत म्हणून त्यांना 'परब्रह्ममूर्ती सद्गुरू' आणि 'श्री गुरुदेवदत्त' असे ही म्हणतात. त्यांना गुरु वंशातील पहिले गुरु, साधक, योगी आणि वैज्ञानिक मानले जाते. भगवान शंकरानंतर गुरु परंपरेत सर्वात मोठे नाव भगवान दत्तात्रेयांचे घेतले जाते.
 
4 त्रिवेणी - असे म्हणतात की भगवान दत्तात्रेय यांनी तिन्ही पंथ, शैव, वैष्णव आणि शाक्त यांच्या समन्वयाचे कार्य केले. ह्यांना या तिन्ही पंथांच्या त्रिवेणी  रूपात मानतात. ह्यांचे प्रामुख्याने तीन शिष्य होते जे तिन्ही राजा होते. त्यापैकी दोन योद्धा जातीचे होते तर एक असुर जातीचे होते. त्यांच्या शिष्यांपैकी एक भगवान परशुराम देखील होते. तिन्ही पंथ (वैष्णव, शैव, शाक्त) च्या संगम स्थळाच्या रूपात भारतातील त्रिपुरा राज्यात त्यांनी शिक्षण दिले. असे देखील म्हणतात की या त्रिवेणीमुळे प्रतिकात्मक त्यांना तीन मुख दाखवले आहेत पण त्यांना तीन मुख नव्हते. भगवान दत्तात्रेय यांच्यात शैव, वैष्णव आणि शाक्तच नव्हे तर तंत्र, नाथ, दशनामी आणि त्यांच्याशी संबंधित अनेक पंथांचा समावेश आहे. हे सर्व पंथामध्ये विशेषतः पूजनीय आहे. हिंदू धर्मातील त्रिदेव ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्ती हिंदू विचारांच्या विलिनीकरणांसाठीच भगवान दत्तात्रेय यांनी जन्म घेतले होते आणि म्हणून ह्यांना त्रिदेवांचे स्वरूप म्हटले आहे. दत्तात्रेय ह्यांना शैवपंथी शिवाचे अवतार आणि वैष्णवपंथी विष्णूंचे अवतार मानले जाते. दत्तात्रेय ह्यांना नाथ पंथाचे नवनाथ परंपरेचे अग्रज देखील मानले जाते. अशी आख्यायिका आहे की रसेश्वर पंथाचे प्रवर्तक देखील दत्तात्रये आहे. भगवान दत्तात्रये ह्यांनी वेद आणि तंत्रमार्ग आपल्या मध्ये विलीन करून एकच पंथाची स्थापना केली.
 
5 दत्तात्रेयांचे शिष्य - मान्यतेनुसार भगवान दत्तात्रेय ह्यांनी परशुरामांना श्री विद्या मंत्र दिले. असे म्हणतात की शिवपुत्र कार्तिकेयाला दत्तात्रेयांनी अनेक शिकवणी दिल्या. भक्त प्रह्लाद ह्यांना अनासक्ती -योगाचे धडे देऊन त्यांना उत्तम राजा बनविले. दुसरीकडे मुनी सांकृती ह्यांना अवधूत मार्ग, कार्तवीर्यार्जुन ह्यांना तंत्रविद्या आणि नागार्जुनाला रसायन विद्या ह्यांचा कृपेने मिळाली. गुरु गोरक्षनाथांना आसन, प्राणायाम, मुद्रा आणि समाधी -चतुरंग योगाचे मार्ग भगवान दत्तात्रये ह्यांच्या भक्तीने प्राप्त झाले.
 
6 दत्तात्रेयांचे 24 गुरु - भगवान दत्तात्रये ह्यांनी आयुष्यात बऱ्याच लोकांकडून शिक्षणाचे धडे घेतले. ह्यांनी वन्य प्राण्यांच्या आयुष्य आणि त्यांच्या क्रियाकलापांपासून शिकवणी घेतली. दत्तात्रेय म्हणतात की ज्यांच्या पासून जे काही गुण मिळवले आहे त्या सर्व गुणांना प्रदाता मानून आपले गुरु मानले आहे, अशा प्रकारे माझे 24 गुरु आहे. पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, आकाश, चंद्र, सूर्य, कपोत, अजगर, सिंधू, पतंग, भ्रमर, मधमाशी, हत्ती, हरीण, मासे, पिंगळा, कुररपक्षी, मुलगा, कुमारिका, साप, शरकृत, कोळी आणि भृंगी.
 
7 दत्त पादुका - असे मानले जाते की दत्तात्रेय रोज सकाळी काशीच्या गंगेत स्नान करायचे ह्याच कारणास्तव माणिकर्णिकांच्या काठी दत्त पादुका दत्त भक्तांसाठी पूजेचे स्थळ आहे. या शिवाय मुख्य पादुकांचे ठिकाण कर्नाटकातील बेळगाव येथे आहे. देशभरात भगवान दत्तात्रेय ह्यांना गुरु मानून ह्यांच्या पादुकेला नमन करतात.
 
8 गुरु पठण आणि जाप - गुरुचरित्राचे श्रद्धेने आणि भक्तीने पठण आणि याच्या सह दत्त महामंत्र 'श्री दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा' चे सामूहिक जप केले आहे. त्रिपुरा रहस्यात दत्त भार्गव संवादाच्या रूपात अध्यात्मांचे गूढ रहस्यांना सांगितले आहे आणि दत्तात्रेय भगवानांचा उल्लेख पुराणात केला आहे. यांच्या वर दोन ग्रंथ आहे 'अवतार चरित्र' आणि 'गुरुचरित्र' जे वेदतुल्य मानले आहे. हे कोणी रचले कोणालाच माहित नाही. मार्गशीर्ष महिन्यात दत्त जयंतीचे 7 दिवसीय गुरुचरित्राचे पठण दत्त भक्तांकडून केले जाते. याचे एकूण 52 अध्याय आहे ज्यामध्ये एकूण 7491 ओळी आहेत. या अध्यायात श्रीपाद, श्रीवल्लभ आणि श्री नरसिंह सरस्वतीच्या चमत्काराचे वर्णन केले आहे.
 
9 वैज्ञानिक दत्तात्रये- हिंदू मान्यतेनुसार दत्तात्रेय यांनी पारद विज्ञानाने व्योमयान उड्डयन शक्तीचा शोध घेतला आणि वैद्यकीय शास्त्रात क्रांतिकारक शोध लावला होता.
 
10 तपोभूमी - श्रीपाद वल्लभ, नृसिंह सरस्वती, स्वामी समर्थ आणि माणिक प्रभू ह्यांना दत्तात्रेयांचे अवतार मानले जाते. दत्त संप्रदायाचा प्रभाव महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकात जास्त आहे. सिद्ध असे श्री क्षेत्र नृसिंहवाडी देऊळात त्या राज्याचे सर्व लोक एकत्र होऊन दत्त जयंती साजरी करतात. या क्षेत्राला दत्त भगवानाची तपोभूमी असेही मानतात.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती