एका विश्वचषक स्पर्धेत सर्वात जास्त शतके करण्याची त्याला संधी आहे. रोहितने या स्पर्धेत दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, इंग्लंड आणि बांगलादेशविरोधात शतक करत त्याने माजी कर्णधार सौरभ गांगुलीचा तीन शतकांचा विक्रम मोडला होता. तसेच त्याने विश्वचषकात सर्वात जास्त शतके करण्याच्या कुमार संगाकाराच्या रेकॉर्डची बरोबरी केली होती. यामुळे आता अजून एक शतक ठोकत सर्वाधिक शतके करण्याचा रेकॉर्ड रोहितच्या नावे होऊ शकते.
भारत साखळी फेरीतील अंतिम सामना श्रीलंकेशी खेळणार आहे. रोहित या सामन्यात 43 धावा करत विश्वचषकातील साखळी फेरीत सर्वात जास्त धावा करण्याचा विक्रम करू शकतो. सध्या सचिन तेंडुलकर (586) आणि मॅथ्यू हेडन (580) या यादीत अव्वल आहेत. ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर (516) आणि एरॉन फिंच (504) देखील या स्पर्धेत आहेत.