रोहितचा पाकला सल्ला तुम्ही मला ते करा तुम्हाला मी हे सांगतो

मंगळवार, 18 जून 2019 (09:53 IST)
भारत पाक सामना म्हणजे फारच रोमांच उभे करतो. त्यामुळे जगातील सर्वांचे लक्ष या सामन्याकडे असते. मात्र यावेळी वर्ल्डकपमधील पाकिस्तानविरोधातील सामना भारताने वेगळ्याच अंदाजात दिसला आहे. भारताच्या विजयात प्रमुख भूमिका असलेल्या रोहित शर्माचा वाटा मोलाचा ठरला आहे. रोहित ने पाकिस्तानच्या गोलंदाजांचा कचरा केला होता. त्याने 113 चेंडूत 140 धावा केल्या आहेत. या खेळीत रोहित शर्माने 14 चौकार आणि 3 षटकारही लगावले आहेत. पाकिस्तानसमोर आपण 337 धावांचा लक्ष्य ठेवले होते. तर पाकिस्तानला कुठल्याही स्थितीत इतकी धावसंख्या पार करणं शक्य नव्हतं असे समोरच आले आहे. त्यात पावसाने व्यत्यय आणला आणि पाकिस्तानसमोरील आव्हान आणखी वाढलं होते. अखेर डकवर्थ लुईस पद्धतीनुसार 89 धावांनी भारताने पाकिस्तानवर आपण मात केली. या जबरदस्त खेळीनंतर भारतीय संघाने माध्यमांशी संवाद साधला होता. यावेळी उपस्थिती एका पाकिस्तानी पत्रकाराने रोहित शर्माला प्रश्न विचारला की, “पाकिस्तानची अवस्था बिकट झाली होती. जर या अत्यंत वाईट अवस्थेतून पाकिस्तानी फलंदाजांना बाहेर येण्यासाठी तुम्ही त्यांना कोणता सल्ला द्याल?”
 
पाकिस्तानी पत्रकाराच्या प्रश्नावर रोहित शर्माने दिलेल्या उत्तराने उपस्थितांमध्ये जोरदार चर्चा झाली. रोहित शर्माने अगदी हसत-हसत पाकिस्तानी पत्रकाराला उत्तर दिले की, “जर मी पाकिस्तानचा क्रिकेट प्रशिक्षक बनलो, तर सांगेन. आता मी काय सांगू  सांगणार?”  त्यामुळे रोहित फक्त पीचवर नाही तर पत्रकार परिषदेत सुद्धा चमकला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती