मुंबईत एका रुग्णालयात 40 वर्षापेक्षा कमी वयाच्या तीन रुग्णांना एव्हॅस्क्युलर नेक्रोसिसवर उपचार करण्यात आले. कोरोना संसर्गातून बरे झाल्यानंतर या रुग्णांना एव्हॅस्क्युलर नेक्रोसिसचा त्रास झाला.डॉक्टर सांगतात की याना फीमर बोन म्हणजे मांडीच्या हाडात वेदना होत होती.हे तिन्ही रुग्ण डॉक्टर असल्यामुळे त्यांना लक्षण ओळखता आले आणि ते ताबडतोब रुग्णालयात उपचारासाठी गेले.त्यांच्या मध्ये हा आजार कोरोनाव्हायरसच्या उपचाराच्या 2 महिन्यांनंतर आढळला आहे.