कोरोना लसीचा दुसरा डोस आणि बूस्टर डोसमध्ये किती अंतर असेल? काय आहे सरकारचे प्लान

रविवार, 26 डिसेंबर 2021 (18:05 IST)
भारतात, कोरोना लसीचा दुसरा डोस आणि बूस्टर डोसमध्ये 9 ते 12 महिन्यांचे अंतर असू शकते. सूत्रांनी रविवारी ही माहिती दिली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोव्हीशील्ड आणि  कोवॅक्सीन लसीचा तिसरा डोस आणि बूस्टर डोस यांच्यातील वेळेचे अंतर निश्चित करण्यासाठी चर्चा सुरू असून लवकरच अंतिम निर्णय घेतला जाईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी उशिरा घोषणा केली की 3 जानेवारीपासून 15 ते 18 वयोगटातील मुलांना कोरोनाची लस दिली जाईल. तर, 10 जानेवारीपासून आरोग्य कर्मी  आणि फ्रंट वर्कर यांना  बुस्टरचा डोस दिला जाईल. देशात ओमिक्रॉन व्हेरियंटची  प्रकरणे वाढत असताना पंतप्रधान मोदींनी ही घोषणा केली आहे.
 
60 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या वृद्धांनाही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार बूस्टर डोस दिला जाईल, जे गंभीर आजारांनी ग्रस्त आहेत,  त्यांच्यासाठी देखील बूस्टर डोस 10 जानेवारीपासूनच सुरू होईल. असे पंतप्रधान मोदी म्हणाले . बुस्टर डोस म्हणजे लसीचा तिसरा डोस.
 
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नॅशनल टेक्निकल अॅडव्हायझरी ग्रुप ऑन इम्युनायझेशन (NTAGI) सध्या लसीचा दुसरा डोस आणि बुस्टर डोसमधील कालावधी 9 ते 12 महिन्यांच्या दरम्यान असावा की नाही यावर चर्चा करत आहे. भारतातील 61 टक्के प्रौढ लोकसंख्येचे कोरोना लसीकरण पूर्ण झाले आहे.तर , प्रौढ लोकसंख्येपैकी 90 टक्के लोकांनी लसीचा किमान एक डोस घेतला आहे.
रविवारी सकाळी 7 वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार, शनिवारी देशात लसीचे एकूण 32 लाख 90 हजार 766 डोस घेतले, त्यानंतर देशातील एकूण लसीकरणाचा आकडा 141.37 कोटींवर गेला आहे. 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती