काय सांगता , कोरोनाची इतकी भीती! एका दिवसात लसीचे 10 डोस घेतले

शनिवार, 11 डिसेंबर 2021 (22:55 IST)
न्यूझीलंडमध्ये एका व्यक्तीने एका दिवसात कोरोना लसीचे दहा डोस घेतले. याप्रकरणी आता आरोग्य मंत्रालयाने चौकशी करण्याचे सांगितले आहे. अहवालात दावा केला जात आहे की, हा तरुण लस घेण्यासाठी वेगवेगळ्या लसीकरण केंद्रांवर गेला होता. लसीचे डोस घेण्यासाठी पैसेही दिले. न्यूझीलंडमध्ये कोरोना विषाणूच्या डेल्टा प्रकाराने मोठा कहर केला होता. 
इथे सरकारने ऑकलंडमध्येही साडेतीन महिन्यांचा लॉकडाऊन लागू केला. पंतप्रधान आर्डेन म्हणाले की सत्य हे आहे की डेल्टा येथे आहे आणि कुठेही जात नाही. येथे प्रशासनाने गेल्या महिन्यात नाईट क्लब, कॅफे आणि सिनेमागृहे उघडली. ऑकलंडमध्ये मास्क लावणे अनिवार्य करण्यात आले होते आणि केवळ काही ठराविक मेळाव्यास परवानगी होती. आरोग्य अधिकार्‍यांनी बार आणि नाईट क्लबमध्ये जाण्यासाठी लस प्रमाणपत्र अनिवार्य केले आहे.
येथे पंतप्रधान म्हणाले की, जगातील कोणताही देश डेल्टाशी पूर्णपणे लढण्यास सक्षम नाही. येथे 83 टक्के प्रौढ लोकांचे लसीकरण करण्यात आले आहे. जेव्हा डेल्टा प्रकार जोरात सुरू होता, तेव्हा ऑकलंडमध्ये या व्हेरियंटची 150 प्रकरणे आढळून आली. मात्र, असे असतानाही येथील प्रशासनाने लसीकरणाचे कार्यक्रम पाहता बरीच सवलत दिली होती. गेल्या वर्षी जेव्हा साथीचा रोग सुरू झाला तेव्हा न्यूझीलंड हा एकमेव देश होता जिथे मृत्यूदर कमी होता.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती