महाडमधील पद्मश्री डॉ. हिम्मतराव बावस्कर विंचूदंश आणि सर्पदंशावरचे प्रभावी औषध शोधून काढणारे डॉक्टर म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांच्याकडे अँटीव्हायरल औषधांनी बरे न झालेले पेशंट्स आले असताना त्यांना प्रयोगाने बरं केले. मेथिलिन ब्लू हे सिंथेटिक रसायन हुंगायला देऊन डॉ. बावसकरांनी या रुग्णांना बरं केलं आहे.
या रुग्णांनी आधी रेमडेसीवीर, फेव्हिपिराविर आणि टॉसिलीझुमॅब अशा अँटीव्हायरल औषधांचे डोसेस घेतले होते; मात्र त्या औषधांनी त्यांना बरं वाटलं नव्हतं. दुसऱ्या लाटेदरम्यान मी 200हून अधिक कोरोना पेशंट्सना या औषधाच्या साह्याने बरं केलं असं डॉक्टरांनी सांगितले. त्यापैकी काही रुग्णांना गंभीर स्वरूपाचा आजार झाला होता मात्र त्यांनाही बरं वाटलं.
Methylene Blue मेथिलीन ब्लू काय आहे
मेथिलीन ब्लू हे एक प्रकारचं क्लोराइड सॉल्ट असतं. सर्वसामान्यपणे याचा वापर डायमध्ये केला जात असून यात अँटीऑक्सिडंट, अँटीमलेरियल, अँटी डिप्रेसंट आणि कार्डिओप्रॉडक्टिव्ह गुणधर्म असतात. मेथिलीन ब्लूची किंमत खूप कमी असते. 10 रुपयांत पाच मिली मेथिलीन ब्लू उपलब्ध होतं असून आपल्या देशात अनेक वर्षांपासून मेथिलीन ब्लूचा वापर अनेक रोगांवरच्या उपचारांसाठी केला जात आहे. मात्र याचा वापर करताना काळजी घेणे आवश्यक असतं. याचा जास्त प्रमाणात वापर केल्यास हे विषाप्रमाणे काम करतं.
कोरोनाचा शरीरावर गंभीर परिणाम होऊ लागतो तेव्हा शरीरातल्या पेशींमध्ये सायटोकाइन स्टॉर्म होतं अर्थात शरीराची रोगप्रतिकारयंत्रणा शरीराच्याच विरोधात काम करू लागते. अशात ब्रॅडिकिनीनची भूमिका महत्त्वाची असते. डॉ. बावस्करांच्या म्हणण्यानुसार मेथिलीन ब्लू हे रसायन ब्रॅडिकिनीनला न्यूट्रलाइज करतं त्यामुळे ते प्रभावी ठरतं.