जान है तो जहान है

सोमवार, 20 एप्रिल 2020 (16:29 IST)
केंद्र सरकार अन इतर राज्यांतील कोरोना विरोधी यंत्रणा युद्ध पातळीवर काम करतेय. पण महाराष्ट्रात कोरोना बाधीतांची संख्या सर्वात जास्त आहे. महाराष्ट्र सरकार याच खापर केंद्रावर फोडून मोकळा झालाय. तस वक्तव्य खुद्द आदित्य ठाकरेंनी केलय. पण असो ही लढाई कुण्या एकाची नसून संपुर्ण जगाची आहे. अन आपल्या देशाची आहे. त्या सह संपुर्ण राज्यांची आहे. कोरोना विरोधी यंत्रणा राबवण तितकस सोपं नाही पण जनतेनही काळजी घेण्याची अजून गरज आहे. महाराष्ट्रात खेड्यापर्यंत कोरोना पोहचलाय याला जबाबदार कोण ? भविष्यात अजून टाळेबंद कठोर करण्याची गरज आहे. वांद्रेतील घटनेविषयी आदित्यंनी केंद्राला जबाबदार धरलय तर एकीकडे विरोधी पक्ष देंवेंद्रजींनी सीएसएमआरच्या नियमांनुसारच कोरोना विषयी उपाय योजना करायला हव्यात असच म्हटलय.

 
मोदींना संपुर्ण जगानं विचारणा केलीय की भारताची परीस्थिती कशा पद्धतीने हाताळलीय. जगाचा भारत आज मार्गदर्शक झालाय तर चीनवरही भारताने विशेष प्रतिबंध आणले आहेत अन जे गरजेचेच होते. आज ह्या कोरोना विरोधी युद्धात प्रतिबंधांत्मक लस येत नाही तोपर्यंत कोरोना संपुष्ठात येत नाही. हे युद्ध जग जिंकू शकत नाही. आर्थिक संकटात जग नक्कीच सापडेल पण भारत यातून कसा सावरेल हीच ह्या पुढे मोदींची कसोटी असेल अन अशा कसोट्या मोदी बरोबर हाताळतात ह्यात शंकाच नकोय. मोदींनी 22 मार्च जनता कर्फ्यु, 5 एप्रिल 9.09 मि. दिवा लावणे, अन ताट वगैरे वाजवून सर्व कोरोना विरोधात लढणार्या पोलिस, डॉक्टर नर्स वगैरे कर्मचारी वर्गाच अभिनंदन ही केल. यातून देश मोदींचच आजही अनुकरण करतोय हेच सिद्ध होतय. पण महाराष्टात परीस्थिती निराळी आहे. उद्धवठाकरेंच सरकार कोरोना रोखण्यात अपयशी ठरलय कारण कोरोना खेड्यापर्यंत पोहचलाय. एवढ्या ताळेबंदीतही एक महीला संपुर्ण बर्याच ठिकाणी फिरुन येते पण तिला कोरोना झालाय कि नाही हे का लक्षात आलं नाही यात चूक कुणाची प्रशासनाची की खुद्द त्या महीलेची.? कोरोना टेस्ट करायच रँपिड टेस्ट मशिनस महाराष्ट्रात का नाही आले अजून अन आलेही असतील तर ते तालूका पातळी का पोहचले नाहीत.? असच चालू असल तर भविष्यात परीस्थिती हाताबाहेर जाईल अन मग सर्व उपाय योजना फेल होतील. ताळेबंदीत हेच मोठ अपयश आहे जे रुग्न कमी होण्या ऐवजी वाढताय अन आज 3300 पेक्षाही संख्या महाराष्ट्रात झालीय जी इतर राज्यांच्या तुलनेत खुपच जास्त आहे. यात सरकारच मोठ अपयश असलं तरी जनतेनही काळजी घ्यालाच हवी. स्वत:ला शिस्त लावून घ्यायला हवीय. कोरोनाला धर्म नाही हेही काही विघ्नसंतोषी लोकांनी समजून घ्याला हवय. जान है तो जहान है हे मोदींच वाक्य लक्षात घ्यायला हवय.

वीरेंद्र सोनवणे
8888244883

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती