येत्या नोव्हेंबरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र अनलॉक होणार : टोपे

शनिवार, 10 ऑक्टोबर 2020 (19:29 IST)
राज्यात सध्या अनलॉकचा ५ वा टप्पा सुरू आहे. एप्रिल महिन्यात कोरोनाने महाराष्ट्र शिरकाव केला. यानंतर कोरोनाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. महाराष्ट्रात शुक्रवारी कोरोनाचे १२,१३४ नवे रुग्ण आढळले. यामध्ये ३०२ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. आता राज्यात लॉकडाऊन होणार नसल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना सांगितलं आहे.  
 
नोव्हेंबरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र अनलॉक होणार असल्याची माहिती राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. आता आपल्याला कोरोनासोबत जगायचं आहे, असं देखील यावेळी राजेश टोपे यांनी सांगितल. नियम पाळणं खूप महत्वाचं त्यामुळे सगळ्यांना कोरोनाकाळातील सर्व नियम काटेकोरपणे पाळणे महत्वाचं आहे. नगरमध्ये आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली आहे. आता शाळा, मंदिरं टप्प्यांमध्ये उघडणार असल्याची माहिती देखील यावेळी त्यांनी दिली. जिम टप्प्याटप्यात उघडणार असल्याची माहिती देखील यावेळी त्यांनी दिली.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती