देशात कोरोना रुग्णांची एकूण संख्या ७१२१ वर पोहोचली आहे. महाराष्ट्र, केरळ आणि कर्नाटकमध्येही मृत्यूची नवीन प्रकरणे नोंदली गेली आहे. त्याच वेळी, लखनऊ आणि ग्वाल्हेरमध्येही कोरोना बाधितांची ओळख पटली आहे.
तसेच महाराष्ट्रातून ४३ वर्षीय पुरूषाचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. तर, कर्नाटकात दोन रुग्णांचा मृत्यू झाला तर केरळमध्ये तीन मृत्यूची नोंद झाली आहे. सर्व रुग्ण वृद्ध होते आणि त्यांना हृदय, फुफ्फुस आणि मधुमेहाशी संबंधित आजार होते.
तसेच ताज्या आकडेवारीनुसार, देशात कोरोनाचे एकूण ७१२१ रुग्ण नोंदवले गेले आहेत. त्याच वेळी, ७४ लोकांचा मृत्यू झाला आहे.