महाराष्ट्रात कोरोनाचे नवीन रुग्ण आढळले

मंगळवार, 10 जून 2025 (15:40 IST)
COVID News : सोमवारी महाराष्ट्रात ६५ नवीन रुग्ण आढळले, त्यामुळे या वर्षाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या १,५०४ झाली आहे. तसेच यातील बहुतेक रुग्ण मुंबई आणि पुण्यातील आहे. पुण्यात २९ आणि मुंबईत २२ नवीन रुग्ण आढळले आहे.
ALSO READ: Mumbra train accident उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रेल्वेमंत्र्यांशी चर्चा केली
याशिवाय नागपूर, कोल्हापूर, ठाणे, सांगली, सातारा आणि परभणी येथेही नवीन बाधित आढळले आहे. राज्यात आतापर्यंत १७ हजारांहून अधिक कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहे. या वर्षी आतापर्यंत मुंबईत सर्वाधिक ६८७ रुग्ण आढळले आहे, त्यापैकी बहुतेक या महिन्यातच नोंदवले गेले आहे. या वर्षी कोरोनामुळे १८ जणांचा मृत्यू झाला आहे, त्यापैकी बहुतेक आधीच आजारी होते.

Edited By- Dhanashri Naik

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती