कोरोनामुक्तांची संख्या वाढली; दिवसभरात 7242 नवे रुग्ण

शुक्रवार, 30 जुलै 2021 (08:13 IST)
राज्यात कोरोना आजारातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढल्याची नोंद झाली तसेच मृत्यूची संख्या देखील गुरुवारी तुलनेने घटली.त्यामुळे दिलासा मिळाला.राज्यात गेल्या 24 तासांत एकूण 7 हजार 242 नव्या कोरोनाबाधित रुग्णांचे निदान झाले. तर एकूण 11 हजार 124 इतके रुग्ण बरे झाले आहेत.
 
राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार,एकूण 190 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील मृत्यूदर2.01 टक्क्यांवर पोहोचला आहे. राज्यात आतापर्यंत एकूण 60 लाख 75 हजार 888 रुग्ण कोरोनामुक्त झाले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.59 टक्के एवढे झाले आहे.

आतापर्यंत तपासण्यात आलेल्या 4 कोटी 75 लाख 59  हजार 938 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 62 लाख 90  हजार156  (13.23  टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले.सध्या राज्यात 4 लाख 78  हजार 704 व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत.तर, 3 हजार 245 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती