राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत सलग दुसऱ्या दिवशी काहीशी वाढ

शुक्रवार, 18 जून 2021 (09:33 IST)
महाराष्ट्रात कोरोनाबाधितांच्या संख्येत सलग दुसऱ्या दिवशी काहीशी वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. मंगळवारच्या तुलनेत बुधवारी कोरोनाबाधितांचा आकडा वाढला होता. गुरुवारीही कोरोनाबाधितांच्या संख्येत काहीशी वाढ झाली. बुधवारी ९३५० कोरोनाबाधितांची नोंद झाली होती, तर गुरुवारी हा आकडा ९८३० इतका झाला. त्यामुळे आता एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ५९ लाख ४४ हजार ७१० झाली असून अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १ लाख ३९ हजार ९६० इतकी झाली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,८८,५७,६४४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५९,४४,७१० (१५.३० टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ८,५०,६६३ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये असून ४९६४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
 
गुरुवारी राज्यात २३६ रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. यामध्ये मुंबई २०, ठाणे १५, पालघर १४, नाशिक १७, अहमदनगर १७, पुणे १३, सातारा ३३, कोल्हापूर २८, सांगली १७, रत्नागिरी १ यांचा समावेश आहे. नोंद झालेल्या एकूण २३६ मृत्यूंपैकी १६७ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ६९ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत.राज्यात आतापर्यंत १ लाख १६ हजार ०२६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.९५ टक्के एवढा आहे. राज्यात ५ हजार ८९० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ५६,८५,६३६ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.६४ टक्के एवढे झाले आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे बुधवारच्या तुलनेत गुरुवारी काहीसे घटलेले दिसले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती