राज्यात सलग तिसऱ्या दिवशी नवीन रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या अधिक

मंगळवार, 4 ऑगस्ट 2020 (09:11 IST)
राज्यात सलग तिसऱ्या दिवशी नवीन रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या अधिक असून सोमवारी दिवसभरात १० हजार २२१ रुग्ण बरे होऊन घरी गेले तर ८९६८ नवीन रुग्णांची नोंद झाली. दररोज मोठ्या संख्येने रुग्ण बरे होत असल्याने राज्यातील ॲक्टिव्ह रुग्णांची (उपचार सुरू असलेले) संख्याही कमी होत आहे. आतापर्यंत राज्यभरात २ लाख ८७ हजार ०३० रुग्ण बरे झाले असून बरे होण्याचे प्रमाण ६३.७६ टक्के आहे. तर सध्या १ लाख ४७  हजार १७ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत.
 
पाठविण्यात आलेल्या २२ लाख ९८ हजार ७२३ नमुन्यांपैकी ४ लाख ५० हजार १९६ नमुने पॉझिटिव्ह (१९.५८ टक्के) आले आहेत. राज्यात ९ लाख ४० हजार ४८६ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३७ हजार ००९ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात सोमवारी  २६६ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.५२ टक्के एवढा आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती