राज्यपालांनी ३० एप्रिलपर्यंत भेटी रद्द केल्या

Webdunia
बुधवार, 1 एप्रिल 2020 (07:33 IST)
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राजभवनात येणाऱ्या लोकांच्या भेटी ३० एप्रिलपर्यंत रद्द केल्या आहेत. त्यामुळे आता महिनाभर राजभवनात येऊन कुणालाही राज्यपालांची भेट घेता येणार नाही.

ज्यांनी भेटीचे आरक्षण केले आहे, त्यांना कालांतराने राजभवनाला भेट देता येईल, असे ट्विट राजभवनाच्या हँडलवरून करण्यात आले आहे. 

संबंधित माहिती

पुढील लेख