जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याबाबत २४*७ मदत कार्य

सोमवार, 30 मार्च 2020 (09:55 IST)
कोरोना आजारासंदर्भात सरकारने जाहीर केलेल्या देशव्यापी लॉकडाऊन दरम्यान नागरीकांना रेशन दुकानावर साहित्य न मिळणे,बाजारात वाढीव दराने वस्तूंची विक्री होणे तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याबाबत राज्यभरातून प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे मा.मंत्री कार्यालयामार्फत तात्काळ निरसन केले जात आहे.
 
जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याबाबत तसेच इतर कोणत्याही स्वरुपाच्या समस्या भेडसावत असल्यास नागरीकांना सहाय्य मिळवून देण्यासाठी भुजबळ यांचे कार्यालय सदैव तत्पर असून तक्रारदारांनी खालील क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
 
श्री.संतोषसिंग परदेशी-खाजगी सचिव-९८७०३३६५६०
श्री.अनिल सोनवणे-विशेष कार्य अधिकारी-९७६६१५८१११
श्री.महेंद्र पवार- विशेष कार्य अधिकारी-७५८८०५२००३
श्री.महेश पैठणकर-स्वीय सहाय्यक-७८७५२८०९६५

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती