लसींचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांसाठी काही निर्बंध शिथील होणार

बुधवार, 21 जुलै 2021 (21:36 IST)
कोरोना प्रतिबंधक लसींचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांसाठी काही निर्बंध शिथील करायला हवेत, याबाबत कुणाचेही दुमत नाही. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि कोविड टास्क फोर्स लवकरच या संदर्भात निर्णय घेतील, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी  एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली. 
 
प्रशासनाने कोरोना बाबतीत घालून दिलेले नियम आणि निर्बंध जनतेने पाळले. कोविडपासून बचाव करण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेतली तर ही लाट थोपवता येऊ शकते,’असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. लसीचे दोन डोस घेतलेल्यांना लोकल प्रवासाची परवानगी द्यावी आणि त्यांच्यावरील अन्य निर्बंध उठवावेत, अशी एक मागणी होत आहे. त्याबाबत विचारले असता ते म्हणाले, राज्य सरकारच्या पातळीवरही याबाबत चर्चा सुरू आहे. जसजसे लसीकरण होत आहे, तसतसे निर्बंध शिथील करण्याची राज्य सरकारची भूमिका आहेच. अजिबात निर्बंध उठत नाहीत असे नाही. पूर्वी विमानाने मुंबईत येणाऱ्या प्रवाशाचा करोना चाचणी अहवाल निगेटिव्ह नसेल तर त्यांना प्रवेश मिळायचा नाही. अशा प्रवाशांना थेट विलगीकरण केले जायचे. आता तसे होत नाही. लसीचे दोन डोस घेतले असतील तर त्याला प्रवेश दिला जातो.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती