येरवडामध्ये ३६७ जणांच्या रक्ताची चाचणी करण्यात आली. त्यामध्ये ५६.६ टक्के जणांमध्ये अँटिबॉडीज आढळल्या. कसबा येथील सोमवार पेठ ३५२ पैकी ३६.१ टक्के, रास्ता पेठ येथील रविवार पेठमध्ये ३३५ पैकी ४५.७ टक्के, लोहियानागर येथील कासेवाडीमध्ये ३१२ पैकी ६५.७ टक्के, नवी पेठ येथील पर्वतीत २९८ पैकी ५६.७ टक्के जणांमध्ये अँटिबॉडीज आढळल्या. एकूण १६६४ सॅम्पलपैकी ५१.५ टक्के बाधित कोरोना होऊन गेल्याचे समोर आलंय.
पुणे विभागीय आयुक्त सौरव राव, आयसर चे संचालक प्रो. शशिधर यांनी ही माहिती दिली. महत्वाचं म्हणजे अँटिबॉडीज आढळलेल्या नागरिकांमध्ये कोरोनविरोधातील प्रतिकारशक्ती विकसित झालेली असते. मात्र अशा लोकांना पुन्हा कोरोना होणार नाही असं अजिबात नाही हेदेखील तज्ज्ञांनी स्पष्ट केलय.