सध्या राज्यात कोरोनाच्या विषाणूचा प्रादुर्भाव होत आहे. जिल्ह्यात प्रशासनावतीने आरोग्य विभाग विविध उपाय करीत आहे. या प्रक्रियेत आपलेही योगदान असावे, या उद्देशाने माजी मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी एक कोटी रुपये देण्याची घोषणा केली. यासंदर्भात निलंगेकर यांनी जिल्हाधिकार्यांयना पत्र दिले आहे.
या निधीतून उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रात व्हेंटिलेटरची सुविधा उपलब्ध करावी, असे त्यांनी जिल्हाधिकार्यांगना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. या निधीतून कुठे व कसा खर्च केला जाईल, याची सविस्तर रूपरेषा आपणास सादर करावी, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.