“कोवीड-19 या जागतिक महामारीचा सामना महाराष्ट्र सरकार मोठ्या धैर्याने करत आहे. मात्र करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात संचारबंदी लागू केल्याने एक नवे आर्थिक संकट उभे राहिले आहे. अशा परिस्थितीत सामाजिक जबाबदारीच्या जाणीवेतून रयत शिक्षण संस्थेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी त्यांच्या एक दिवसाच्या वेतना इतकी सुमारे दोन कोटी रुपये रक्कम धनादेशाद्वारे मुख्यमंत्री सहायत्ता निधी-कोवीड-19 मध्ये जमा करण्याचा निर्णय एकमुखाने घेतला आहे. असं शरद पवार यांची स्वाक्षरी असलेल्या पत्राद्वारे सांगण्यात आलं आहे.”