कोरोनाशी लढा देण्यासाठी उद्योग जगताकडूनही मोठा आर्थिक हातभार लागत आहे. काही कलाकारांनीही मदत केली आहे. तसेच राजकीय लोकप्रतिनिधींकडूनही मदत होत आहे. आमदार आणि खासदारांनीही मदत केली आहे. तसेच राज्यातील उद्योगपतींनीही हातभार लावण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे कोरोना विरुद्धचा लढा जिंकण्यात मोठी मदत होणार आहे. करोनाशी लढण्यासाठी केंद्राच्या आणि राज्याच्या सहाय्यता निधीसाठी मदतीचा ओघ सुरु झाला आहे.
करोनाशी लढण्यासाठी केंद्राच्या आणि राज्याच्या सहाय्यता निधीसाठी मदतीचा ओघ सुरु झाला आहे. यामध्ये टाटा ग्रुपने आजवरची सर्वात मोठी मदत जाहीर केली आहे. टाटा ट्रस्टने केंद्र सरकारला विविध उपाययोजनांसाठी ५०० कोटी रुपयांच्या मदतीची शनिवारी घोषणा केली. त्यानंतर काही वेळातच टाटा सन्सने अतिरिक्त १००० कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे.
दरम्यान, राहुल बजात यांच्याकडून जाहीर झालेल्या मदतीनंतर बजाज यांच्या या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांचं कौतुक केले आहे. त्यांनी ट्विटरवरून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत