बुस्टर डोस नाही, मग वेतन पण नाही

गुरूवार, 21 जुलै 2022 (21:17 IST)
कोरोना लसीचा बुस्टर डोस  न घेणाऱ्यांमध्ये कोविड काळात आघाडीवर असणाऱ्या फ्रंट लाईन वर्करचा मोठा समावेश असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता प्रशासनानेही कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. संभाजीनगर जिल्ह्यात ज्या फ्रंट लाईन कर्मचाऱ्यांनी बुस्टर डोस न घेतलेल्या वेतन न देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता बुस्टर डोस न घेतलेल्या कर्मचाऱ्यांना वेतन मिळणार नाही असा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे. अनेक फ्रंट लाईन कर्मचाऱ्यांनी कोरोनाच्या बुस्टर डोसकडे दुर्लक्ष केल आहे आणि त्यामुळे आता हा निर्णय घेण्यात आलेला आहे. एकीकडे कोरोना रुग्ण वाढत असताना लसीकरणाकडे पाठ फिरवणे योग्य नाही अशी चर्चा जिल्हाधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत झाली.
 
त्यामुळे कर्मचाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी एकप्रकारे दणकाच दिला आहे आहे. संभाजीनगर जिल्ह्यात 49 हजार फ्रंट लाईन वर्कर्स आहेत. त्यांनी अजूनही बूस्टर डोस घेतला नाही. संभाजीनगरमध्ये लसींचा पहिला डोस घेणाऱ्यांची टक्केवारी 86 टक्के आहे तर दुसरा डोस घेणाऱ्या लोकांची टक्केवारी अवघी 65 टक्के आहे. त्यामुळे अद्याप अनेकांनी कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला नसल्याचे समोर आले आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती