लॉकडाऊन करण्याचा कोणताही हेतू नाही, परंतु परिस्थिती तशाच मार्गाने चालत आहे
कोरोनाचे वाढते प्रकरण लक्षात घेता महाराष्ट्र सरकारने 28 मार्चपासून संपूर्ण राज्यात नाईट कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेतला आहे. या दरम्यान सर्व मॉल्स रात्री 8 वाजे पासून ते सकाळी 7 वाजे पर्यंत बंद राहणार. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी ऑनलाईन बैठक घेऊन सर्व जिल्ह्यांच्या जिल्ह्याधिकाऱ्यांना निर्देश दिले. जमाव एकाच ठिकाणी जमण्यापासून रोखण्यासाठी आणि संक्रमणाची गती कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
या बैठकीत उद्धव ठाकरे म्हणाले की, राज्यात लॉकडाऊन करण्याच्या हा हेतू नाही.परंतु राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत त्या कारणामुळे आपण त्याच मार्गाने जात आहोत. त्यांनी सर्व जिल्ह्याधिकाऱ्यांना निर्देश दिले की रुग्णालयात बेड,औषधोपचार आणि वैद्यकीय सुविधांची पुरेशी व्यवस्था करावी.
धोका टळलेला नाही तर वाढला आहे .
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की सध्या भारतात कोरोनाच्या दुसर्या लाटेचा कहर कायम आहे गेल्या काही दिवसात प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. हे सांगता येणं कठीण आहे की येत्या काही दिवसात रुग्णांच्या संख्येत कितपत वाढ होईल.अशा परिस्थितीत कडक उपाय लागू केले पाहिजे त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले की एखाद्या जिल्ह्यात रुग्णांची संख्या वाढत आहे तर तिथे लॉक डाऊन लावण्यात येईल. तूर्तता हे अवलंबवू नये.
लोकांनी नियमांना मोडले तर कठोर निर्बंध लागू केले जातील
ते म्हणाले की लोकांनी कोरोना प्रोटोकॉल चे नियम मोडले तर कठोर निर्बंध लागू करण्यात येईल.कोरोना प्रोटोकॉल चे पालन होत आहे की नाही प्रशासनाने लक्ष देऊन नियम मोडणाऱ्यांच्या विरुद्ध कठोर कारवाई करावी.